आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Some Muslims Do Not Believe In Scientists, They Can Go To Pakistan; Controversial Statement Of BJP MLA Sangeet Som

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त विधान:काही मुस्लिमांना वैज्ञानिकांवर विश्वास नाही, असे लोक पाकिस्तानात जाऊ शकतात; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी नसून शेतकरीविरोधी आहेत : संगीत सोम

देशातील काही मुस्लिमांना आपले शास्त्रज्ञ आणि पोलिसांवर विश्वास नाही. त्यांचा पंतप्रधानांवरही विश्वास नाही. पण त्यांचा पाकिस्तानवर विश्वास आहे. असे लोक हवे असल्यास पाकिस्तानात जाऊ शकतात, परंतु शास्त्रज्ञांवर शंका घेऊ नका. असे वादग्रस्त विधान भाजप आमदार संगीत सोम यांनी केले आहे.

संगीत सोम मंगळवारी उत्तर प्रदेशच्या चंदौसी येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, परंतु कोरोना लसीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांसह इतरही काही जणांना त्यांनी प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे.

केजरीवालांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे

संगीत सोम यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षावर निशाणा साधला. आपचे आमदार सोमनाथ भारती यांनी काही महिने तुरुंगात घालवल्याने ते गुंडांसारखे बोलत आहेत. केजरीवालांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.

'अखिलेश यांनी उत्तर प्रदेशला मुघल साम्राज्य केले होते'

यावेळी सोम यांनी शेतकरी आंदोलनावर देखील भाष्य केले. नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणारे लोक शेतकरी नाहीत तर ते शेतकरीविरोधी आहेत. सोम यांनी यापूर्वी चंदौसीमध्येच भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला होता. अखिलेशांच्या काळात उत्तर प्रदेशात मोगलाई आली होती, अशी टीका त्यांनी केली होती. अखिलेश या साम्राज्याचे शेवटचे शासक असतील, कारण यापुढे त्यांना दुसरी संधी मिळणार नाही, असेही सोम म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...