आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांचा दावा:देशात काही निवृत्त न्यायमूर्ती भारतविरोधी गँगचा हिस्सा

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही निवृत्त न्यायमूर्ती आणि कार्यकर्ते भारतविरोधी गँगचा हिस्सा झाले आहेत. ते न्यायपालिकेला विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवार केला. त्यांनी कॉलेजियम पद्धतीवरही टीका केली.दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सहभागी झाले. ते कॉलेजियम पद्धतीचा बचाव करत म्हणाले, ‘कोणतीच पद्धत आदर्श नसते, पण ही सर्वोत्तम असून ती आम्ही विकसित केली आहे.’

ते म्हणाले, न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आमचा उद्देश होता. रिजिजू म्हणाले, दिल्लीतील एका चर्चासत्राला सुप्रीम कोर्टाचे काही निवृत्त न्यायाधीश आणि ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित होते. विषय होता ‘न्यायमूर्तींच्या नियुक्तीमध्ये जबाबदारी.’ मात्र, संपूर्ण दिवस सरकार न्यायपालिका कशी आपल्या ताब्यात घेत आहे, यावरच चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...