- Marathi News
- National
- Some Selected Photos Of Prime Minister Narendra Modi's Visit To Dehu, Latest News And Update
10 फोटोंत मोदींचा देहू दौरा:तुकोबांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणाला वारकऱ्यांची तोबा गर्दी, चिमुकल्या तुकोबाने वेधले लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी देहूतील संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मोदींनी खास मराठी शैलीत आपल्या भाषणाची सुरुवात करुन उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः त्यांच्या डोक्यावरील डिझायनर पगडीने सर्वांचे लक्ष्य वेधले. पाहुया या कार्यक्रमातील मोदींचे काही निवडक फोटो...
मोदींनी चिपळ्या व तंबोरा हातात घेऊन उपस्थितांचे लक्ष्य वेधले.
तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यक्रम स्थळी येताना उपस्थितांचे अभिवादन स्विकारले.
शिळा मंदिराच्या लोकार्पणाला पंचक्रोशितील महिला वारकरी तुळशीवृंदासह उपस्थित होत्या.
या छोट्या तुकोबांनी उपस्थितांची मने जिंकली.
शिळा मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडताना पंतप्रधान मोदी.
मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमाला संत मंडळीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
देहू संस्थानच्यावतीने यावेळी मोदींचा माऊलींची प्रतिमा देऊन सत्कार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात व्यासपीठावर संवाद रंगला.