आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अयोध्या आणि श्रीरामाविषयी भक्तिभाव दर्शवणारे काही किस्से; पांडेय बंधूंनी आणले 159 नद्यांचे जल, रंजित बनवतात भोग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऊर्मिला देवींनी 28 वर्षांपासून केले नाही अन्न ग्रहण, 5 ऑगस्टला संकल्पपूर्ती

रामभक्त १९६८ पासून राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जल एकत्र करताहेत

दोन भाऊ राधेश्याम पांडे व त्रिफला. दोघांचे वय ७० वर्षांहून जास्त आहे. दोन्ही बंधू १९६८ पासून राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पवित्र नद्यांचे जल एकत्र करत आहेत. रविवारी दोघे भारतातील १५१ नद्या, ८ मोठ्या नद्या, ५ समुद्रांचे जल घेऊन अयोध्या गाठली. राधेश्याम म्हणाले, आम्ही पायी, सायकल, रेल्वे, विमानाने प्रवास करून जमा केली. आम्ही १९६८ ते २०१९ पर्यंत प्रवास केला. त्रिफला हे कवी आणि दिव्यांग आहेत. अयोध्येत ६० वर्षीय भगवत प्रसाद टेलर यांचे दुकान आहे. तीन पिढ्यांपासून त्यांचे कुटुंब रामलल्लाचा पोशाख शिवतात. माझे वडील बाबूलाल टेलर म्हणून प्रसिद्ध आहेत असे भगवत म्हणाले.

ऊर्मिला देवींनी २८ वर्षांपासून केले नाही अन्न ग्रहण, ५ ऑगस्टला संकल्पपूर्ती

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये राहणाऱ्या ८१ वर्षीय ऊर्मिला देवी यांनी २८ वर्षांपासून अन्न ग्रहण केले नाही. त्यांची तपस्या ५ ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. ६ डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्येत ढाचा पाडल्यानंतर दंगल झाली होती. तेव्हाच त्यांनी मंदिराचे भूमिपूजन होईपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही, असा संकल्प केला.त्या फळाहारासह राम नामाचे स्मरण करत उपवास करत. संकल्प करताना त्यांचे वय ५३ वर्षे होते. ऊर्मिला म्हणाल्या, मंदिर ही गोष्ट माझ्यासाठी पुनर्जन्मासारखी आहे.

रामलल्लास ३० वर्षांपासून दररोज सकाळ-संध्याकाळ १ किलो पेढा

अयोध्येत रामलल्लास खुर्चनचा पेडा लागतो. गेल्या ३० वर्षांपासून भोगच्या रूपात हा पेढा चंद्रा मिष्ठान्न भंडार येथून पाठवला जातो. त्याचे संचालक रंजीत गुप्ता म्हणाले, दोन पिढ्यांपासून आम्ही भोग प्रसाद पाठवत आहोत. सकाळ-सायंकाळ प्रत्येकी एक किलो पेढे पाठवले जातात. आमच्या वडिलांनी ही परंपरा सुरू केली होती. आम्ही आजही भोगचा प्रसाद ८० रुपये किलो दराने देतो. रामलल्लाचे मंदिर साकार होत आहे, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...