आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेलंगणातील लाजीरवाणी घटना:कोरोनातून ठीक झाल्यानंतर घरी परतलेल्या 65 वर्षीय आईला घरात घेण्यास मुलगा आणि सुनेचा नकार

निजामाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तेलंगणातील निजामाबादमधील घटना, पती गेल्यानंतर मुलगा आणि सूनवर अवलंबून होती महिला

ज्या आईने मुलाला चालायला शिकवले. आपले दुध पाजून लहानाचे मोठे केले. तिच आई म्हातारी झाल्यावर मुलगा व सुनेने तिला घरी ठेवण्यास नकार दिला. ही घटना अशावेळी घडली, जेव्हा आई कोरोनासारख्या घातक आजारातून बरी होऊन घरी आली. नात्याला लज्जास्पद करणारी ही घटना तेलंगणाच्या निजामाबादची आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय महिलेला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. महिलेने कोरोनावर मात केली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर महिला जेव्हा घरी परत आली तेव्हा मुलाने तिला घरात घेण्यास नकार दिला.

पोलिसांनी समजून सांगितल्यावर घरात ठेवण्यास तयार झाले

मुलगा व सून आपल्या आईला घराबाहेर सोडून घराला कुलूप लावून हैदराबादला फिरायला गेले. वृद्ध महिला तीन दिवस घराबाहेर पडून होती. आजूबाजूच्या लोकांनी महिलेला जेवण दिले. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेच्या मुलाला आणि सूनला बोलावून समुपदेशन केले. मग तो आपल्या आईला घेऊन जाण्यास तयार झाला.

बातम्या आणखी आहेत...