आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुजरात प्रदेश भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणी सोनल मोदी यांना स्थानिक निवडणुकीत तिकीट देण्यास नकार दिला आहे. सोनल मोदींनी महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवकची उमेदवारी मागितली होती. पण, मोठ्या नेत्यांच्या नातेवाइकांना निवडणुकीसाठी तिकीट वाटप करणे हे नियमांच्या विरोधात असल्याचे सांगताना गुजरात भाजपने त्यांना तिकीट नाकारले.
गुजरातमध्ये फेब्रुवारी महिन्यात स्थानिक निवडणुका होणार आहेत. सोनल ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थोरले बंधू प्रहलाद मोदी यांच्या कन्या आहेत. प्रहलाद मोदी उचित मूल्य दुकानदार संघाचे अध्यक्ष आहेत. सोनलने मंगळवारी माध्यमांसमोर येऊन सांगितले होते की त्यांनी अहमदाबाद महापालिका निवडणुकीसाठी बोदकदेव वार्डातून उमेदवारीसाठी भाजपकडून तिकीट मागितले आहे. पण, भाजपने गुरुवारी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये सोनल यांचे नाव नाही. कारण विचारले असता पक्षाने नियमांचा दाखला दिला.
भाजपमध्ये सगळेच समान
गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी सांगितले, की भाजपात सर्वांना समान मानले जाते. सर्वांसाठी एकसारखे नियम आहेत. हा निर्णय पक्षाच्या नवीन नियमानुसार घेण्यात आला आहे. त्यानुसार, पक्षातील मोठ्या नेत्यांच्या नातेवाइकांना निवडणुकीसाठी तिकीट दिले जाणार नाही. परंतु, आपण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणी या नात्याने नाही तर एक भाजप कार्यकर्त्या म्हणून तिकीट मागितले होते असे सोनल मोदींनी म्हटले आहे.
गुजरातच्या अहमदाबाद, सुरत, राजकोट, वडोदरा, जामनगर आणि भावनगर इत्यादी ठिकाणी महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. यासाठी 21 फेब्रुवारीला मतदान केले जाईल तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. राज्यातील 31 जिल्हा परिषद, 231 पंचायत आणि 81 नगर परिषदांसाठी 28 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्याची मतमोजणी 2 मार्च रोजी केली जाईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.