आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली फोगाटांचा VIDEO व्हायरल:डिस्कोत PA सुधीर व सुखविंदरसोबत डान्स; वारंवार स्वतःची सुटका करवून घेताना दिसल्या

हिसार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनाली फोगाटचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 36 सेकंदाचा हा व्हिडिओ डिस्कोमधील असल्याचे दिसून येत आहे. सोनालींसोबत त्यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदरही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. सोनाली यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. दोघेही सोनाली यांच्यासोबत नाचत आहेत, मात्र सोनाली त्यांच्यासोबत डान्स करायला अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे.

सोनाली सुखविंदर यांना स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान सुधीरही त्यांच्या शेजारी उभा असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. सोनाली निघून गेल्यावर सुखविंदर एका व्यक्तीकडून त्याचा मोबाइल घेतो. हा व्हिडीओ सुखविंदरने स्वतः बनवला असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडिओ कधी आणि कुठे, याची पुष्टी नाही

सोनाली यांचा डान्सचा व्हिडिओ कुठे आणि कधीचा आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. काही जणांकडून हा व्हिडिओ सोनाली यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी 22 ऑगस्टच्या रात्रीचा तर काही जणांकडून हा व्हिडिओ जुना असल्याचे सांगण्यात येत आहे . सोनाली यांच्या भावाने सांगितले की, आम्हाला या व्हिडिओबाबत कोणतीही माहिती नाही.

सुधीर सांगवानवर बलात्काराचा आरोप

सोनाली यांचे भाऊ रिंकू ढाका यांनी गोवा पोलिसात तक्रार दाखल केली असून सुधीर सांगवानवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप करण्यात आला आहे. 3 वर्षांपासून तो सोनालींवर बलात्कार करत असून व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

गोपाल कांडांवर मदतीचा आरोप

सोनालीचे भाऊ वतन ढाका यांनी सांगितले की, गोव्यातील सिरसाचे आमदार गोपाल कांडा हे सुधीर आणि सुखविंदरला मदत करत आहेत. सुखविंदर पूर्वी गोपाल कांडासोबत काम करत होता. सुखविंदरने गोपाल कांडा यांच्याशी संपर्क साधला. गोपाल कांडा त्यांना मदत करत असल्याचे मला कालच कळले. त्यामुळे पोलिस एफआयआर नोंदवत नसून याप्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत.

सीबीआय तपास न करण्यावर प्रश्न उपस्थित

नवीन जयहिंद यांनी सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी न करण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. सीबीआय तपास झाल्यास या सर्व प्रकरणाचे सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे. या भीतीमुळे सीबीआय चौकशीचे आदेश दिले जात नाहीत. सुधीर सांगवानची योग्य प्रकारे चौकशी केल्यास सर्व सत्य समोर येऊ शकते.

नवीन जयहिंद म्हणाले की, सोनाली फोगाट भारतीय जनता पक्षाच्या सदस्या होत्या. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे ही पक्षाची जबाबदारी आहे, कारण आपल्याच सदस्याला न्याय मिळू शकत नसेल तर भाजप जनतेला न्याय कसा देणार? सीबीआयच्या तपासातूनच सत्य बाहेर येईल, अन्यथा सोनाली यांचा मृत्यू एक रहस्यच बनून राहील .

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

सोनाली फोगाट यांचे 23 ऑगस्ट रोजी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत गोव्यातील पीए सुधीर आणि सुखविंदर होते. मंगळवारी सकाळी आठ वाजता सुधीरने सोनाली यांच्या भावाला फोन करून मृत्यूची माहिती दिली. त्यानंतर त्याने फोन उचलला नाही. सुधीर आणि सुखविंदरने त्यांची हत्या केल्याचा सोनालीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. सुधीरला सोनाली यांची मालमत्ता हडप करायची होती त्यामुळेच त्याने सोनाली यांची हत्या केली आहे.

बातम्या आणखी आहेत...