आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीए सुधीर मला ब्लॅकमेल करतो, त्याला पैसे देऊ नका:सोनाली फोगाट यांचा दिग्दर्शक अक्रमशी झाला होता संवाद; त्यानंतर झाली होती हत्या

पानिपत I अमन वर्माएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोनाली फोगाट खून प्रकरणानंतर उत्तरप्रदेशातील एका चित्रपट दिग्दर्शकाने नवा खुलासा केला आहे. निर्माता-दिग्दर्शक मोहम्मद अक्रम अन्सारी यांनी सांगितले की, मृत्यूच्या सुमारे वीस दिवसांआधी सोनाली यांनी माझ्याशी संवाद साधताना सांगितले होते की, पीए सुधीरला तुम्ही कोणतेही पैसे देऊ नका. तो मला ब्लॅकमेल करित आहे. मी नैराश्यात आहे. मी स्वतः भेटून पुढील कार्यक्रमावर बोलू.

दिव्य मराठीशी बोलताना दिग्दर्शक अक्रम अन्सारी म्हणाले की, सोनाली फोगाट यांनी विविध बारा कार्यक्रमांमध्ये संधी देण्यासाठी मी सोनाली यांच्याशी संपर्क साधला होता. परंतू त्यांच्या पीए सुधीरमुळे आमच्या कामासंदर्भातल्या करारावर स्वाक्षरी होत नव्हती. सोनाली यांनी सांगितले होते की, माझे काही पुरावे सुधीरकडे आहेत, त्यामुळे तो मला कायम ब्लॅकमेल करतो.

सुधीर म्हणाला होता, सर्व निर्णय मीच घेतो
अक्रम अन्सारी यांनी दिव्य मराठी बोलताना सांगितले की, मी सुमारे आठ ते नऊ महिन्यांपूर्वी 12 कार्यक्रमांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करण्यासाठी सोनाली फोगाटला ईमेलद्वारे संपर्क साधला होता. सोनाली पीए सुधीर सांगवानचा नंबर देत असत आणि त्यांच्याशी संपर्क करायला सांगत असत. मी सुधीरशी संपर्क साधला सोनाली यांना आमच्या विविध कार्यक्रमात काम करण्याची विनंती करा, असे सांगितले. एखाद्या सोनाली मॅडम यांच्याशी बोलून होकार घ्या. तेव्हा सुधीर म्हणाला की, सोनाली यांचे सर्व निर्णय तोच घेतो. सोनाली फोगाट यांच्याशी माझे बोलणे व्हावे, असा आग्रह अक्रम यांनी धरल्यानंतर एकदा माझे त्यांच्याशी बोलणे झाले. तेव्हा मला मला सोनाली यांनी काम करण्यास होकार दर्शवत तुम्ही करारनामा पाठवून देण्यास सांगितले.
दीड कोटींचा करार होणार होता
सोनालीच्या संमतीनंतर दीड कोटींचा करारनामा तयार करून त्याची प्रत पीए सुधीर सांगवान यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‌ॅपवर पाठविले गेले. तसेच अक्रमने सुधीरला सांगितले की, तुम्ही तुमच्या सीएला हा करार दाखवून घ्या. तेव्हा सुधीर म्हणाला होता की, तो यापुर्वी सरकारी वकील होता आणि आता सोनालीसोबत काम करतो. अखेर करारावर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांना दिल्ली किंवा हिस्सार येथे येण्याचे निमंत्रण दिले गेले.

एक दिवस सुधीर सोनाली फोगाट यांना न कळवता दिल्लीला घेऊन आला. दिल्लीला आल्यानंतर सुधीरने अक्रमला फोन केला. व तुम्ही करारासाठी का आला नाहीस, असा प्रश्न केला. आता आम्ही हिसारला जाणार आहोत. सुधीरने ऑनलाइन करार करण्याबाबत बोलून पैसे खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी दबाव टाकला. यावर अक्रमने सांगितले की, जोपर्यंत तो सोनालीला भेटत नाही. त्यांना काम समजावून सांगत नाही. तोपर्यंत पैसे दिले जाणार नाही.

अक्रम म्हणाला - सोनाली म्हणाली होती मी नैराश्यात
दिग्दर्शक अक्रम यांनी सांगितले की, सोनाली यांच्या मृत्यूच्या सुमारे 20 दिवस आधी माझे सोनाली यांच्याशी बोलणे झाले होते. तेव्हा सोनाली यांनी सांगितले की, मी सुधीर पासून वेगळी झालेली आहे. मी नैराश्यात आहे. मला खूप अस्वस्थ वाटते. सुधीरला कोणतेही पेमेंट करू नका. जेणेकरून त्याला रक्कम मिळणार नाही. अभिनेत्री सोनाली म्हणाल्या होत्या की, सुधीरसोबत माझे जमत नाही. सुधीरने कराराबाबत अनेक गोष्टी माझ्यापासून लपवल्या आहेत. तुम्ही सुधीरशी काहीही बोलू नका, मी तुमच्याशी भेटून यावर बोलू.

सोनाली फोगाट म्हणाल्या होत्या की, सुधीरमुळे मी डिप्रेशनमध्ये आहे. सुधीरची नजर माझ्या मालमत्तेवर आहे. आता तूम्ही सुधीरशी बोलणार नाही. ना त्याला कोणतीही रक्कम देणार. त्यानंतर काही दिवसाने सोनाली यांच्या मृत्यूची बातमीच समोर आली. त्यानंतर अक्रम यांनी सोनाली यांचा पीए सुधीरशी फोनवरून संपर्क केला. तेव्हा सुधीरले सांगितले की, सोनालीला हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...