आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली फोगाट प्रकरणात 'लेटर बॉम्ब':कुटुंबाला मिळालेल्या पत्रांत दावा - 10 कोटींत मर्डर, कारस्थानी नेत्यांच्या नावांचाही उल्लेख

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टिकटॉक स्टार व भाजप नेत्या सोनाली फोगाट हत्याकांडाप्रकरणात लेटर बॉम्ब फुटला आहे. सोनालीच्या कुटुंबाला 2 अज्ञात पत्र मिळालेत. त्यात विरोधकांनी स्वतःचे राजकीय करिअर वाचवण्यासाठी पीए सुधीर संगवान याला 10 कोटी रुपये देऊन सोनालीची हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

अज्ञात चिठ्ठी पाठवणाऱ्याने सोनालीचा पीए सुधीर हा केवळ मोहरा असल्याचा दावा केला आहे. सुधीर पैशाच्या आमिषाला बळी पडला. सोनालीचा मेहुणा अमन पुनिया यांच्या मते, पहिली चिठ्ठीची माहिती आम्ही सीबीआयला दिली आहे. त्यांनी आम्हाला ती आमच्याकडे ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर गुरूवारी आम्हाला पुन्हा दुसरे पत्र मिळाले.

पत्रात हिसार, फतेहाबाद व टोहानाच्या नेत्यांचा उल्लेख

हे अज्ञात पत्र सोनाली फोगाटचे कुटुंबीय व पोलिसांना पाठवण्यात आले आहे. त्यात हिसार, फतेहाबाद व टोहानाच्या नेत्यांच्या नावाचा उल्लेख आहे. हे नेते एकाच पक्षाशी संबंधित आहेत. पत्रात म्हटले आहे की, सोनालीपासून स्वतःचे राजकीय करिअर वाचवण्यासाठी तिच्या खुनाचा कट रचण्यात आला. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा हा आमचा उद्देश आहे. आम्हाला सोनालीची मुलगी यशोधराचे खूप वाईट वाटते. पत्र लिहिणाऱ्याने आपली ओळख लपवून ठेवली.

सोनालीच्या कुटुंबाला पाठवण्यात आलेले पहिले पत्र.
सोनालीच्या कुटुंबाला पाठवण्यात आलेले पहिले पत्र.

पत्राच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह

सोनाली हत्याकांडाप्रकरणी पाठवण्यात आलेल्या या पत्राच्या टायमिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण, लवकरच आदमपूर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक होणार आहे. त्याची घोषणा झाली आहे. त्यामुळे हे पत्र व्हायरल करणाऱ्यांच्या हेतू संशयास्पद वाटत आहे.

7 मुद्यांत समजून घ्या सोनाली फोगाटच्या हत्येचा घटनाक्रम

  • गोव्यात गत 22-23 ऑगस्ट रोजी सोनाली फोगाटचा अचानक मृत्यू झाला.
  • सोनाली फोगाटच्या कुटुंबाने पीए सुधीर संगवान व सुखविंदरवर हत्येचा आरोप केला.
  • शवविच्छेदन अहवालात सोनालीच्या शरीरावर जखमेच्या खुणा व ड्रग्जच्या ओव्हरडोसचे पुरावे मिळाले.
  • गोवा पोलिसांनी सुधीर व सुखविंदरसह 5 आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.
  • गोवा पोलिसांची चौकशीसाठी सोनालीचे फार्महाऊस, घर व गुरूग्राममध्ये धाव.
  • कुटुंबीयांच्या मागणीनुसार गोवा सरकारने प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले.
  • सीबीआयच्या 2 सदस्यीय पथकाने हिसारला येऊन सोनाली फोगाटच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तेव्हापासून चौकशी सुरू आहे.

सोनालीचा राजकीय वारसा बहिणीकडे

सोनाली फोगाटचा राजकीय वारसा आता तिची बहिण रुकेश पुनिया यांच्याकडे गेला आहे. काही दिवसांपूर्वीच हिसारमध्ये एक खाप पंचायत झाली. त्यात सोनालीची मुलगी यशोधराच्या परवानगीने हा निर्णय घेण्यात आला. यशोधराने आपण अल्पवयीन असल्याचे नमूद करत मावशी आपली शुभचिंतक असल्याचे स्पष्ट केले आहे.

रुकेश आदमपूर पोटनिवडणूक लढवणार

राजकीय वारसा मिळाल्यानंतर सोनालीची बहिण रुकेश पुनियाने आदमपूर पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या मते, पक्षाचे अजून माहिती नाही. पण मी सोनालीची पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा जरूर पूर्ण करेल. दुसरीकडे, सोनालीचा भाऊ वतन ढाका यांनी उमेदवारी मिळो किंवा न मिळो भाजपतच राहण्याची घोषणा केली आहे.

सोनालीचा 29 हजार मतांनी झाला होता पराभव

सोनाली फोगाटने 2019 ची विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली होती. त्यात काँग्रेसचे कुलदिप बिश्नोई यांनी त्यांचा 29 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. यावेळी बिश्नोई स्वतः भाजपत आलेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...