आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली फोगाट अंत्यसंस्कार IN PHOTOS:मुलीने आईला दिला मुखाग्नी; मामाला म्हणाली- बाबा नाही, आईही गेली, मी एकटी कशी राहणार?

हिसार5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनाली फोगाट आज पंचतत्वात विलीन झाल्या. त्यांची कन्या यशोधरा हिने त्यांना मुखाग्नी दिला. यशोधराने सोनाली यांना खांदाही दिला. सोनालींच्या पार्थिवावर ऋषी नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हिसार सिव्हिल रुग्णालयाच्या शवागारातून त्यांचे पार्थिव धोदर फार्म हाऊसवर नेण्यात आले आहे. त्यांचे पार्थिव घेण्यासाठी सकाळपासूनच त्यांचे नातेवाईक रुग्णालयात उपस्थित होते मात्र यासाठी त्यांना तासभर वाट पाहावी लागली. शुक्रवारी पहाटे अडीच वाजता त्यांचे पार्थिव गोव्याहून हिसार येथे आणण्यात आले.

22 ऑगस्टच्या रात्री गोव्यात सोनालींची हत्या झाली होती. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता सोनालींच्या मृत्यूची बातमी देशभर पसरली. शवविच्छेदनात शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या. गोवा पोलिसांनी सोनाली यांचे पीए सुधीर सांगवान आणि त्याचा एक सहकारी सुखविंदर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सोनालींच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

सोनाली फोगाट यांचा अखेरचा प्रवास....

यशोधरा आणि तिच्या चुलत बहिणीने सोनाली यांना मुखाग्नी दिला.
यशोधरा आणि तिच्या चुलत बहिणीने सोनाली यांना मुखाग्नी दिला.
सोनाली फोगाट यांच्या पार्थिवावर मुलगी यशोधरा आणि मामाच्या मुलाने अंत्यसंस्कार केले.
सोनाली फोगाट यांच्या पार्थिवावर मुलगी यशोधरा आणि मामाच्या मुलाने अंत्यसंस्कार केले.
सोनाली फोगाट यांची मुलगी यशोधरा तिच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत पोहोचली.
सोनाली फोगाट यांची मुलगी यशोधरा तिच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत पोहोचली.
ऋषी नगर स्मशानभूमीत सोनाली फोगटच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडे गोळा करताना कुटुंब
ऋषी नगर स्मशानभूमीत सोनाली फोगटच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडे गोळा करताना कुटुंब
अंतिम निरोपाच्या आधी सोनाली फोगाटांचे अखेरचे छायाचित्र.
अंतिम निरोपाच्या आधी सोनाली फोगाटांचे अखेरचे छायाचित्र.
मुलीने दिला आईला खांदा, सर्वांचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य
मुलीने दिला आईला खांदा, सर्वांचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य
भाजप नेत्या सोनाली फोगाट यांना भारतीय जनता पक्षाचा झेंडा समर्पित केला
भाजप नेत्या सोनाली फोगाट यांना भारतीय जनता पक्षाचा झेंडा समर्पित केला
सोनाली फोगाट यांचे पार्थिव आणताच फार्म हाऊसचे दरवाजे बंद करण्यात आले. सोनालींच्या सासरच्या आणि माहेरच्या गावातील लोक मोठ्या संख्येने फार्म हाऊसवर पोहोचले होते.
सोनाली फोगाट यांचे पार्थिव आणताच फार्म हाऊसचे दरवाजे बंद करण्यात आले. सोनालींच्या सासरच्या आणि माहेरच्या गावातील लोक मोठ्या संख्येने फार्म हाऊसवर पोहोचले होते.
सोनाली फोगाट यांचे पार्थिव फार्म हाऊसवर अंतच नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. आई-वडील, भाऊ-बहिणीसह कन्या यशोधरा हिला सांभाळण्याचा कुटुंबाकडून प्रयत्न केला जात आहे.
सोनाली फोगाट यांचे पार्थिव फार्म हाऊसवर अंतच नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. आई-वडील, भाऊ-बहिणीसह कन्या यशोधरा हिला सांभाळण्याचा कुटुंबाकडून प्रयत्न केला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...