आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील शेतकऱ्यांनीही िदल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आंदाेलन व शेतकऱ्यांच्या भावनांवर तेथे गाणी रचली जात असून सोशल मीडियावर ती लोकप्रिय झाली आहेत. १९४७ मधील फाळणीनंतर भारतातील भागाला चढ़दा पंजाब (सूर्याेदयाचा) व पाकिस्तानील पंजाबला लेंहदा पंजाब (सूर्यास्ताचा) म्हटले जाते. या गाण्यांत फाळणीच्या वेदनाही आहेत.
पंजाबी गीतांचा भावानुवाद : जग म्हणतंय, जणू झोपलेल्या सिंहाला जागं केलं आहे - पाकिस्तानी कलाकार विकार भिंडर यांचे ‘दिल्ली मोर्चा’ गीत शेतकरी वेदनांवर केंद्रित आहे. त्याचा अर्थ आहे, ‘पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्लीत तळ ठोकलाय. शेतकरी कधीच रिकामा नसतो, हे दिल्लीने लक्षात ठेवावे. आंदोलक पंजाबींनी रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये पेरण्या केल्या आहेत. पंजाबची ही जमात कुणावर अन्याय होऊ देत नाही, ना कुणावर अन्याय करते. ती तर नागाच्या फण्यावर पाय ठेवून रान आबादानी करते’
- शहजाद सिद्ध यांच्या ‘पंजाब’ गाण्यांत फाळणी व शेतकऱ्यांच्या वेदनाही आहेत. गीत आहे, ‘१९४७ ची फाळणी आम्हा पंजाबींची दुखती नस आहे. फाळणीच्या गोष्टींची सल अद्याप उरात आहे. अजून तर आधीच्याच वेदना सरल्या नाहीत, तोच शेतकऱ्यांचा मुद्दा आणून नवी जखम केली आहे. चढ़ता पंजाब हा लेंहदे पंजाबला साद घालतोय. जग म्हणतंय, जणू झोपलेल्या सिंहाला जागे केले आहे.’
- लिजाज घुग यांचे गीत ‘खन्ना शहर काय अन् लाहोर काय, धमन्यांतील रक्त तर एकच आहे. आमची बोली एक, एकच वारसा आहे. बुजुर्ग म्हणतात, अखंड पंजाब (चढ़दा-लेंहदा) आगळाच आहे. हा सर्व राजकीय सारीपाट आहे... अन् आम्ही त्याचे मोहरे. आमच्या रक्तात फक्त पंजाब आहे, चढ़दा अन् लेंहदा. याच पंजाबचे दोन भाग आहेत, पण कसलाही फरक नाही.’
- ए.आर. वाटो यांच्या गीताचा अर्थ आहे, ‘शेतात नांगर हाकणाऱ्या बैलांसोबत जो लहानाचा मोठा झाला, त्याला आज अतिरेकी म्हटलं जातंय. स्वत:च्याच शेतात गुलाम ठरण्याची त्याला शंका आहे. यामुळे या शेतकऱ्यांच्या भावना आज संतप्त आहे. चढ़ता पंजाबने स्वत:ला एकाकी समजू नये.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.