आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonia Gandhi Ranthambore Birthday Celebration; Rahul Gandhi | Bharat Jodo Yatra| Priyanka Gandhi | Sonia Gandhi

रणथंबोरमध्ये सोनिया गांधींचा वाढदिवस साजरा:37 वर्षांनी संपूर्ण कुटुंब आले एकत्र; राजीव गांधींच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात, हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीच्या निकालानंतर आणि भारत जोडो यात्रेला ब्रेक घेत राहुल गांधींसह संपूर्ण गांधी कुटुंब आज रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात पोहचले. सोनिया गांधी यांचा 76 वा वाढदिवस येथे साजरा करण्यात येत आहे. गांधी कुटुंब गुरुवारी संध्याकाळीच येथे पोहोचले.

सोनिया गांधी यांचा आज वाढदिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या देशातील सर्वात जुना राजकीय पक्षाची धुरा संभाळत आहेत. सोनियांचा जन्म 9 डिसेंबर 1946 रोजी इटलीतील एका छोट्या गावात झाला. सोनिया यांचे खरे नाव अँटोनिया माइनो असे होते.

सोनिया गांधी गुरुवारी संध्याकाळी टायगर सफारीला गेल्या होत्या. येथे त्यांना काही वाघही दिसले.
सोनिया गांधी गुरुवारी संध्याकाळी टायगर सफारीला गेल्या होत्या. येथे त्यांना काही वाघही दिसले.

सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी रणथंबोरमध्ये टायगर सफारीचा आनंद लुटला. नंतर गांधी कुटुंब हॉटेल शेरबागमध्ये माघारी परतले. येथे पोहोचल्यानंतर त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. राजीव गांधी आपल्या कुटुंबासह जोगी महालात राहिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी अती थंडीमुळे गांधी कुटुंबीयांनी टायगर सफारी केली नाही. सायंकाळी गांधी कुटुंब पुन्हा एकदा सफारीवर जाण्याची शक्यता आहे.

आपल्या 76 व्या वाढदिवसानिमित्त सोनिया गांधी या हॉटेल शेरबागमध्ये राहुल, प्रियंका आणि काही निवडक लोकांसोबत एक छोटासा सेलिब्रेशनही करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोनिया गांधी गुरुवारी सकाळी रणथंबोर येथे आल्या होत्या. जिथे हेलिपॅड बनवले होते. येथे 37 वर्षांपूर्वी राजीव गांधींसाठी हेलिपॅडही तयार करण्यात आले होते.
सोनिया गांधी गुरुवारी सकाळी रणथंबोर येथे आल्या होत्या. जिथे हेलिपॅड बनवले होते. येथे 37 वर्षांपूर्वी राजीव गांधींसाठी हेलिपॅडही तयार करण्यात आले होते.

सोनिया-राहुल हेलिकॉप्टरने तर प्रियंका गाडीने रणथंबोरमध्ये आल्या. सोनिया गांधी गुरुवारी सकाळीच हेलिकॉप्टरने रणथंबोरला पोहोचल्या होत्या. तिघेही हॉटेल शेरबाग येथे मुक्कामाला आहेत. विशेष म्हणजे प्रियंका गांधी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अनेकदा रणथंबोरला भेट देतात. 2022 मध्ये प्रियंका गांधी तिसऱ्यांदा येथे आल्या आहेत.

बुंदी जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेतून ब्रेक घेत राहुल गांधीही रणथंबोरला पोहोचले. ते संध्याकाळी आईसोबत सफारीसाठी बाहेर पडले
बुंदी जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेतून ब्रेक घेत राहुल गांधीही रणथंबोरला पोहोचले. ते संध्याकाळी आईसोबत सफारीसाठी बाहेर पडले

सोनिया गांधी उद्या भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ शकतात
सोनिया गांधी शनिवारी भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी आज राहुल आणि प्रियंका यांच्यासह बुंदी जिल्ह्यातील गुडला चंदनजी येथे जाणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही उद्या सकाळी 8 वाजता गुडला चंदनजीसाठी रवाना होतील. भारत जोडो यात्रा सकाळी सहा वाजता सुरू होते. त्यामुळे राहुल गांधी यात्रेसाठी आधी रवाना होतील की उशिराने यात्रेत सामील होतील हे निश्चित नाही.

रणथंबोरचा गांधी घराण्याशी दीर्घकाळ संबंध आहे. 37 वर्षांनंतर ही संधी आली आहे, जेव्हा संपूर्ण गांधी कुटुंब रणथंबोरला एकत्र आले आहे. हे ठिकाण राजीव गांधींच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक होते. आता सोनिया गांधी शुक्रवारी प्रियंका आणि राहुल गांधींसोबत आपला वाढदिवस येथे साजरा करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

खरं तर, 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी रणथंबोरमध्ये काही दिवस मित्रांसोबत घालवले होते. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, श्वेता बच्चन यांच्यासोबत ते इथे आले होते. त्यांच्या आगमनानंतर शेरपूर गावातच हेलिपॅड बनवण्यात आले होते. या हेलिपॅडवर आता 37 वर्षांनंतर पुन्हा गांधी कुटुंबातील दोन सदस्य उतरले आहेत.

सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींचा एकाच हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा
गांधी कुटुंबातील दोन सदस्य वर्षभर रणथंबोरमध्ये वाढदिवस साजरा करतात. गेल्या वर्षी प्रियंका गांधी यांनीही आपला वाढदिवस शेरबाग या हॉटेलमध्ये साजरा केला होता. यावर्षी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याची पत्नी ट्विंकल खन्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी येथे आला होता.

सोनियांना पाहताक्षणीच प्रेमात पडले होते राजीव गांधी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज जन्मदिवस आहे. सोनिया गांधी यांचा जन्म इटलीतला, पण आता त्या पूर्णपणे भारतीय झाल्या आहेत. या दोघांचे लग्न झाले तेव्हा सोनियांच्या कुटुंबातील कोणीही लग्नाला उपस्थित नव्हते. सोनियांचे कन्यादान गांधी घराण्याचे कौटुंबिक मित्र प्रसिद्ध कवी व अमिताभ बच्चन यांचे वडील दिवंगत हरिवंशराय बच्चन यांनी केले होते. सोनिया गांधींच्या जन्मदिनानिमित्त जाणून घ्या सोनिया आणि राजीव यांच्या प्रेमाबद्दल फारशा उजेडात न आलेल्या गोष्टी. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भारत जोडो यात्रेत पोहोचल्या सोनिया गांधी

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कर्नाटकातील मंड्या येथे पक्षाच्या भारत जोडो यात्रेला हजेरी लावली. राहुल यांनी आईच्या खांद्यावर हात ठेवून स्वागत केले. यानंतर यात्रेत उपस्थित महिला नेत्यांनी सोनिया गांधींचा हात हातात घेतला.सुमारे 15 मिनिटे चालल्यानंतर राहुल यांनी सोनियांना परत कारकडे पाठवले. मात्र, काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सोनिया पुन्हा पदयात्रेत सहभागी झाल्या. सोनिया महिनाभरापूर्वीच कोरोनामधून बऱ्या झाल्या आहेत. सोनियांची प्रकृती अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बातम्या आणखी आहेत...