आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonia Gandhi Calls Meeting Of 15 Opposition Parties This Evening; Many Big Leaders Including Mamta, Uddhav Will Be Involved, AAP And BSP Are Not Invited; Fews And Live Updates

विरोधी पक्षांची बैठक:सोनिया गांधींनी 15 विरोधी पक्षांची बोलावली बैठक; ममता, उद्धव ठाकरेसह अनेक मोठ्या नेत्यांचा सहभाग, आप आणि बसपाला आमंत्रण नाही

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आगामी निवडणुकांवर चर्चा होण्याची शक्यता

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज 15 विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. ही बैठक सुरु झाली असून यामध्ये सोनिया गांधी व्हर्च्युअली संवाद साधत आहेत. विरोधी पक्षांच्या या बैठकीमध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक मोठे नेते उपस्थित आहेत. विशेष म्हणजे या बैठकीसाठी आम आदमी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीला आमंत्रण केले गेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

विरोधी पक्षांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान पेगासस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदा आणि महागाईच्या मुद्यांवरुन सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे विरोधी पक्षांत चांगली एकता असल्याचे अनेक वेळा बोलले जात आहे. या बैठकीच्या माध्यमातून विरोधी पक्ष सत्ताधारी भाजपला एकजुटता दाखवण्याचा प्रयत्न करतोयं की काय? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

आगामी निवडणुकांवर चर्चा होण्याची शक्यता
पुढील काही दिवसांत यूपीसह अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष एकत्र येत विधानसभेच्या रिंगणात उतरु शकतो. त्यामुळे या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकींवरही चर्चा केली जाऊ शकते. यासोबतच अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती आणि ईशान्येकडील काही घडामोडींबाबत विरोधी पक्ष चर्चा करु शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...