आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना गुरुवारी ताप व छातीतील संसर्गामुळे तातडीने दिल्ली स्थित सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
रुग्णालयाने जारी केले निवेदन
सर गंगाराम रुग्णालय ट्रस्ट सोसायटीचे चेअरमन डॉक्टर डी एस राणा यांनी सांगितले की, 'यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना 2 मार्च रोजी चेस्ट मेडिसिन विभागाचे सीनिअर कंसलटंट डॉक्टर अरुप बसू यांच्या निगराणीखाली सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तपासणी सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.'
राहुल गांधी ब्रिटन दौऱ्यावर
राहुल गांधी ब्रिटन दौऱ्यावर असताना सोनियांची प्रकृती बिघडली आहे. राहुल केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांना व्याख्यान देण्यासाठी ब्रिटनला गेलेत. तिथे व्याख्यानात बोलताना त्यांनी आपल्या फोनची हेरगिरी होत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले - माझ्या फोनची हेरगिरी केली जाते. विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातात. भारतात राजकीय नेत्यांना नेहमीच असा दबाव सहन करावा लागतो.
जानेवारीतही बिघडली होती प्रकृती
सोनिया गांधी यांना गत जानेवारी महिन्यातही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाले होते. जवळपास आठवडाभर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली होती. त्यावेळी भारत जोडो यात्रेत व्यस्त असणारे राहुल गांधीही पदयात्रा सोडून दिल्लीला पोहोचले होते.
काँग्रेस अधिवेशनात झाल्या होत्या सहभागी
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये गत 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान काँग्रेसचे महाअधिवेशन झाले होते. त्यात सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या. उल्लेखनीय बाब म्हणजे सोनिया गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी होत्या. राहुल गांधी यांनी 2017 मध्ये अध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांनी या पदाची सुत्रे हाती घेतली होती.
सोनिया गांधींशी संबंधित खालील बातमी वाचा...
सोनियांनी राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत:रायपूर अधिवेशनात म्हणाल्या- भारत जोडो यात्रेसोबतच संपेल माझी राजकीय वाटचाल
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या 85व्या अधिवेशनात पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. सोनिया शनिवारी आपल्या भाषणात म्हणाल्या - भारत जोडो यात्रेमुळे माझी राजकीय वाटचाल आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे.
पक्षाध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून आलेल्या चढ-उतारांबाबत सोनियांनी पहिल्यांदाच चर्चा केली. त्या म्हणाल्या- 1998 मध्ये मी पहिल्यांदा पक्षाध्यक्ष झाले तेव्हपासून आजपर्यंत म्हणजे गेल्या 25 वर्षांत अनेक चांगले आणि काही वाईट अनुभव आले.
2004 आणि 2009 मधील पक्षाची कामगिरी असो किंवा मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करण्याचा माझा निर्णय असो. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी हे समाधानकारक होते. यासाठी मला कार्यकर्त्यांचे पूर्ण सहकार्य लाभले. मला सर्वात जास्त समाधान देणारी गोष्ट म्हणजे माझा भारत जोडो यात्रेने माझी राजकीय वाटचाल समाप्त होऊ शकते. पक्षासाठी हा टर्निंग पॉइंट आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.