आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sonia Gandhi Letter To PM Modi | Sonia Gandhi, Narendra Modi, PM Modi, Corona Vaccine Price, Corona Vaccine Price List, Corona Vaccine List, Vaccination Process; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र:काँग्रेस अध्यक्षा म्हणाल्या, सरकारने मोफत लसीकरणाची जबाबदारी टाळली; 18 वर्षांवरील सर्व लोकांचे भेदभाव न करता लसीकरण व्हावे

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1 मेपासून 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण

देशात वाढत्या कोरोना संर्सगामुळे सक्रीय रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशात ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर आणि अन्य अत्यावश्यक औषधांचा तुडवडा निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहले आहे. दरम्यान, त्यामध्ये सोनिया गांधी यांनी केंद्र सरकाराच्या धोरणाला कोंडीत पकडले आहे. सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने लसीकरणाच्या मोहिमेमध्ये भेदभाव न करता 18 वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण करावे.

सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारावर आरोप करत म्हटले की, लसीकरणाच्या नवीन धोरणांमुळे सरकारने 18 ते 45 वर्षांवरील लोकांची मोफत लसीकरणाची जबाबदारी टाळली आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, सरकारचे हे धोरण अनियंत्रित आणि भेदभाववादी असून त्यामध्ये त्वरित बदल करण्याची मागणी केली आहे.

लसीच्या दरांवर प्रश्न उपस्थित केले
पत्रात म्हटल्यानुसार, सीरम इंस्टिट्यूटने नुकतेच कोविशिल्ड लसीचे दर प्रसिद्ध केले. याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी प्रश्न उपस्थित करत एकाच लसीचे दर वेगवेगळे कसे काय असू शकतात? दरम्यान, देशात सध्या कोरोनामुळे ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटरची कमतरता असताना लोकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अश्या परिस्थितीत सरकार इतरांच्या फायद्यासाठी परवानगी कसे देऊ शकते.

सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा - सोनिया गांधी
काँग्रेसची आधीपासून हीच भूमिका होती की, या संदर्भांत आढावा घेऊन नंतरच लसीचे दर तयार करावे. देशात लसीच्या एकच दरांवर प्रत्येक व्यक्तींची सहमती असणार आहे. त्यामुळे सरकारने आपल्या निर्णयात लवकरात लवकर बदल करुन आपला निर्णय मागे घेण्याची विनंती सोनिया गांधी यांनी केली.

गेल्या दिवसात सीरम लसीचे दर
सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाने ही लस तयार केली असून याचे नवीन दर नुकतेच प्रसिद्ध केले आहेत. यानुसार, खाजगी हॉस्पिटलला ही लस 600 रुपयांत मिळणार आहे. यापूर्वी फक्त 250 रुपयांत मिळत होती. दरम्यान, केंद्र सरकाराला पहिल्यासारख्याच किंमतीत म्हणजे 150 रुपयांत मिळेल. तर दुसरीकडे, राज्य सरकाराला यासाठी 400 रुपये मोजावे लागणार आहे.

1 मेपासून 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी एका उच्चस्तरीय बैठकीत 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत केंद्रीय औषध प्रयोगशाळेतून जाहीर करण्यात आलेल्या डोसपैकी 50% डोस केंद्र सरकारला मिळेल आणि उर्वरित 50% साठा राज्य सरकार आणि खुल्या बाजारात मिळू शकेल.

बातम्या आणखी आहेत...