आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहार, यूपीसह 7 राज्यांमध्ये अग्निपथ या लष्करात भरतीच्या योजनेला तीव्र विरोध होत आहे. अनेक ठिकाणी तरुणांनी हिंसक आंदोलन करत रेल्वेगाड्या जाळल्या. दरम्यान, रुग्णालयातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आंदोलक तरुणांना पत्र लिहिले आहे. सोनिया यांनी पत्रात तरुणांना अहिंसक पद्धतीने लढा देण्याचे आवाहन केले आहे.
अग्निपथ योजना दिशाहीन, आम्ही तरुणांच्या पाठीशी
सोनिया गांधींनी पत्रात म्हटले आहे की, ही योजना पूर्णपणे दिशाहीन असून तरुणांची फसवणूक आहे. त्या म्हणाल्या की, या योजनेवर संरक्षण तज्ज्ञ आणि माजी सैनिकांनीदेखील प्रश्न उपस्थित केले आहेत. ही योजना मागे घेण्यासाठी काँग्रेस अहिंसक आंदोलन करेल.
3 वर्षांपासून भरती नाही, तरुणाई निकालाच्या प्रतीक्षेत
सोनिया गांधींनी लिहिले- मला तुमची वेदना समजते. सरकारने गेल्या तीन वर्षांपासून भरती काढलेली नाही. त्याचबरोबर हवाई दलात परीक्षा होऊनही तरुणांना निकाल आणि नियुक्तीची प्रतीक्षा आहे. आम्ही हे दुःख समजतो आणि तुमच्यासोबत आहोत.
सोनिया गांधी 7 दिवसांपासून रुग्णालयात
कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यावर सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने 12 जून रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 2 जून रोजी सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या.
उद्या जंतरमंतरवर काँग्रेसचे आंदोलन, दिग्गज नेते उतरणार रस्त्यावर
अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ काँग्रेस उद्या म्हणजेच 19 जून रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे खासदार, कार्यकारिणी सदस्य आणि AICC पदाधिकारी या सत्याग्रहात सहभागी होणार आहेत.
दुसरीकडे, राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी लिहिले की, सलग 8 वर्षे भाजप सरकारने जय जवान, जय किसानच्या मूल्यांचा अपमान केला आहे. पंतप्रधानांना काळा शेती कायदा मागे घ्यावा लागेल, असे मी यापूर्वीही म्हटले होते. त्याचप्रमाणे त्यांना माफीवीर बनून देशातील तरुणांचे म्हणणे मान्य करावे लागेल आणि अग्निपथ परत घ्यावी लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.