आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे चिंतन शिबिर:सोनिया बड्या नेत्यांना म्हणाल्या -पक्षाने आपल्याला खूप काही दिले, आता ऋण फेडण्याची वेळ

उदयपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या उदयपूरमध्ये काँग्रेसचे 3 दिवसीय चिंतन शिबिर सुरू आहे. या शिबिरात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वच नेते व कार्यकर्त्यांना अंग झटकून कामाला लागण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या -"पक्षाने आपल्याला खूप काही दिले. आता पक्षाचे उपकार ऋण फेडण्याची वेळ आली आहे."

सोनियांनी यावेळी सत्ताधारी भाजप व मोदी सरकारवरही तिखट हल्ला चढवला. "भाजप व केंद्र सरकार देशात भीतीदायक व असुरक्षेचे वातावरण तयार करत आहे. अल्पसंख्यकांना भीती दाखवली जात आहे. धर्माच्या नावावर ध्रुविकरण केले जात आहे. अल्पसंख्यक आपल्या देशाचे समान नागरिक आहेत. ही आपल्या प्राचिन अनेकतावादी संस्कृतीची ओळख आहे. विविधतेत एकता हीच आपली ओळख आहे," असे त्या म्हणाल्या.

सोनिया म्हणाल्या -"आज राजकीय प्रतिस्पर्धकांची मुस्कटदाबी केली जात आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. इतिहास पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात पंडित जवाहरलाल नेहरु यांचे योगदान सुनियोजितपणे हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे लोक महात्मा गांधींचा खून करणाऱ्या व्यक्तीचे गुनगाण करत असून, गांधींची शिकवण पुसून टाकत आहेत."

त्या म्हणाल्या -"देशाची प्राचिन संस्कृती नष्ट केली जात आहे. दलित, आदिवासी व महिलांत असुरक्षेचे वातावरण आहे. देशात भीतीदायक वातावरण तयार केले जात आहे. भाजप देशातील जनतेला एकमेकांविरोधात चिथावण्याचे पातक करत आहे."

तत्पूर्वी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, "यूपीए सरकारच्या काळात लोक काय म्हणतील याचा विचार केला जात होता. पण, आज या लोकांनी धर्माच्या नावाने संपूर्ण देश ताब्यात घेतला आहे. धर्म, जातीच्या नावाने दंगली पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता राजस्थान त्यांच्या हिटलिस्टवर आहे. राज्यात केव्हाही दंगली, सीबीआय व ईडीची छापेमारी सुरू होते."

काँग्रेस​​​​ कामाचे मार्केटिंग करत नाही

गहलोत म्हणाले -"देशाने 70 वर्षांत खूप प्रगती केली. काँग्रेसचे सिद्धांत, धोरण देशाच्या डीएनए सारखी आहेत. त्यानंतरही ते निर्लज्जपणे काँग्रेसने 70 वर्षांत काय केले असा प्रश्न करतात. आम्ही काम करतो. पण, मार्केटिंग करत नाही. हा आमचा कच्चा दुआ आहे. याऊलट हे खोटारडे लोक काम कमी व मार्केटिंग जास्त करतात. कधी गुजरात मॉडेलची गोष्ट करतात."

लेकसिटीच्या ताज अरावलीत होणाऱ्या या शिबिरात काँग्रेसच्या ओल्ड गार्डपासून तरुण चेहरे दिसून येत आहेत. येथे येणारे बहुतांश नेते या शिबिरावर समाधान व्यक्त करत आहेत. हे शिबिर सर्वसाधारण इव्हेंट नाही. यात पक्ष नेतृत्वापासून घराणेशाहीपर्यंतच्या मुद्यांवर ठोस निर्णय घेतले जातील, असे ते म्हणालेत.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी हॉटेलात प्रियंका गांधींचे स्वागत केले.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी हॉटेलात प्रियंका गांधींचे स्वागत केले.
सोनिया गांधी यांचेही मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी उदयपूरमध्ये स्वागत केले.
सोनिया गांधी यांचेही मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी उदयपूरमध्ये स्वागत केले.
चिंतन शिबिराची प्रदिर्घ काळापासून तयारी सुरू आहे. देशभरातील बडे नेते याठिकाणी पोहोचत आहेत. प्रियंका गांधीही पोहोचल्यात.
चिंतन शिबिराची प्रदिर्घ काळापासून तयारी सुरू आहे. देशभरातील बडे नेते याठिकाणी पोहोचत आहेत. प्रियंका गांधीही पोहोचल्यात.
ताज अरावली हॉटेलात काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सोनियांचे स्वागत केले. उदयपूर रेल्वे स्थानकावर राहुल गांधींचे स्वागत करण्यात आले.
ताज अरावली हॉटेलात काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सोनियांचे स्वागत केले. उदयपूर रेल्वे स्थानकावर राहुल गांधींचे स्वागत करण्यात आले.
राहुल गांधी रेल्वे स्थानकाहून मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत बसमधून हॉटेल ताजला पोहोचले.
राहुल गांधी रेल्वे स्थानकाहून मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत बसमधून हॉटेल ताजला पोहोचले.
उदयपूर रेल्वे स्थानकावर राहुल गांधींना रिसिव्ह करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत व सचिन पायलटही पोहोचले.
उदयपूर रेल्वे स्थानकावर राहुल गांधींना रिसिव्ह करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत व सचिन पायलटही पोहोचले.
बातम्या आणखी आहेत...