आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा आणि रायबरेलीच्या खासदार सोनिया गांधी यांनी लोकसभेत CBSE च्या 10वी बोर्डाच्या परीक्षेतील वादग्रस्त प्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी या परिच्छेदाला महिलाविरोधी म्हटले. त्याचबरोबर हा प्रश्न मागे घेण्याची आणि शिक्षण मंत्रालयाची माफी मागण्याची मागणी त्यांनी केली.
या आक्षेपार्ह परिच्छेदाविषयी विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात गदारोळही केला. त्यानंतर लगेचच सीबीएसईने आपली चूक मान्य करून प्रश्न हटवण्याचा निर्णय घेतला. यासोबतच विद्यार्थ्यांना या पॅसेजचे पूर्ण गुण देण्याची घोषणाही करण्यात आली.
शिक्षण मंत्रालयाला माफी मागण्याची मागणी
सोनिया गांधी म्हणाल्या - 'शिक्षण मंत्रालयाने महिलांप्रती संवेदनशील असले पाहिजे. सीबीएसई अभ्यासक्रमातील महिलांबाबत जो आक्षेपार्ह मजकूर त्वरित काढून टाकण्यात यावा. महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही. या प्रकरणी सीबीएसई आणि शिक्षण मंत्रालयाने महिलांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी.
राहुल गांधी आणि प्रियंका यांनी परीक्षा कठीण असल्याचे सांगितले
सीबीएसईच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या इंग्रजी पेपरवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले - 'आरएसएस आणि भाजप तरुणांचे मनोबल आणि भविष्य चिरडण्यावर टपून बसले आहेत. विद्यार्थी कट्टरतेने नव्हे तर मेहनतीने यश मिळवतात. आत्तापर्यंत सीबीएसईचे बहुतेक पेपर खूप कठीण होते पण इंग्रजीच्या पेपरमध्ये कॉम्प्रिहेंशनचा पॅसेज अधिक मूर्खपणाचा होता.
या वाक्यांवर घेतला आक्षेप
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) च्या दहावीच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील उताऱ्यामध्ये 'लैंगिक रूढिवादिते'ला कथितरित्या प्रोत्साहन दिल्याविषयी वाद निर्माण झाला आहे. यामुळे मंडळाने हे प्रकरण 12 डिसेंबर रोजी म्हणजेच काल विषय तज्ञाकडे पाठवले. शनिवारी झालेल्या इयत्ता 10वी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 'स्त्री मुक्तीमुळे मुलांवरील पालकांचा अधिकार संपुष्टात आला' आणि 'माता आपल्या पतीचे अनुसरण करुनच आपल्या लहान मुलांकडून सन्मान मिळवू शकते' अशा काही वाक्यांवर आक्षेप घेण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.