आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonia Gandhi Statement Controversy; Karnataka Election Rally | BJP Demands FIR | Karnataka

कर्नाटक निवडणूक:सोनियांच्या वक्तव्यावर निवडणूक आयोगात तक्रार; एफआयआर दाखल करण्याची भाजपची मागणी

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 50 हून अधिक सभा आणि सुमारे 20 रोड शो केले आहेत.   - Divya Marathi
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 50 हून अधिक सभा आणि सुमारे 20 रोड शो केले आहेत.  

भाजपने सोमवारी सोनिया गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. कर्नाटकातील त्यांच्या एका वक्तव्याबाबत भाजपने हे पाऊल उचलले आहे. काँग्रेस कर्नाटकची प्रतिष्ठा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला तडा जाऊ देणार नाही, असे सोनियांनी रविवारी म्हटले होते.

या वक्तव्याबाबत शोभा करंदलाजे यांनी हे विधान धक्कादायक आणि अमान्य असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करताना त्यांनी सोनिया गांधींनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे सांगितले. सोनियांवर कडक कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी निवडणूक आयोगाला केले.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रियांकाचा रोड शो, तर राहुल बसमध्ये

कर्नाटकात 10 मे रोजी निवडणुका होणार आहेत. आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. प्रियंका गांधी यांनी विजयनगरमध्ये रोड शो केला. यासह प्रियांकाने निवडणूक प्रचाराची सांगता केली. तर राहुल गांधी यांनी नोकरदार महिलांसोबत बसमध्ये बसून बसस्थानकावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि सेल्फीही काढले.

या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 65 हून अधिक सभा आणि सुमारे 20 रोड शो केले आहेत. यामध्ये सोनिया गांधी यांचीही सभा होती. सोनिया गांधी अनेक वर्षांनंतर प्रचारासाठी आल्या होत्या. सोनिया यांनी हुबळी येथे जाहीर सभेला संबोधित केले.

राहुल गांधींना बसमध्ये प्रवास करताना पाहून महिला प्रवाशांचे चेहरे उजळले होते.
राहुल गांधींना बसमध्ये प्रवास करताना पाहून महिला प्रवाशांचे चेहरे उजळले होते.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रियांका गांधी यांनी विजयनगरमध्ये रोड शो केला.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रियांका गांधी यांनी विजयनगरमध्ये रोड शो केला.

प्रियंका यांचा शायरी अंदाज

या निवडणुकीत प्रियांका चांगल्याच सक्रिय राहिल्याचे दिसून आले. रविवारी कर्नाटकमधील एका सभेला संबोधित करताना प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या की, मी आज सकाळी पाहिले की निवडणूक प्रचारादरम्यान पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी महागाई, विकास आणि जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल बोलत होते. पण संध्याकाळी पंतप्रधानांनी महागाई, विकास आणि रोजगार यावर बोलण्याऐवजी कुठल्यातरी आंतरराष्ट्रीय कटाबद्दल बोलायला सुरुवात केली.

प्रियांका यांनी बंगळुरू दक्षिण येथील एका सार्वजनिक सभेत "तू इधर उधर की बात ना कर, ये बता काफिला क्यों लूटा; मुझे रहजानो से गिला नहीं, तेरी रहबरी का सवाल है।" ही कविताही ऐकवली.