आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sonia Gandhi To Hold Meeting With CMs Of Congress Ruled States Today To Discuss NEET, JEE Exams

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळात परीक्षा:जेईई-नीट परीक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधींनी बोलावली बिगर एनडीए राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे येण्याची शक्यता कमी

सोनिया गांधी आज बिगर एनडीए राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करतील. यात राज्यांवरील गुड्स अँड सर्विसेज टॅक्स (जीएसटी) सोबतच नीट-जेईई परीक्षेच्या मुद्द्यावर चर्चा होईल. नॅशनल टेस्टिंग एजेंसी (एनटीए) ने मंगळवारी म्हटले की, परिक्षा ठरेलेल्या वेळी, म्हणजेच जेईई 1 सप्टेंबरत ते 6 सप्टेंबर आणि नीट 13 सप्टेंबरला होईल. यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने दोन्ही परीक्षा रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे.

पश्चिम बंगाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री बैठकीला येतील

कोरोना महामारीमुळे अनेक राज्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितल्यानुसार, व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे होणाऱ्या या मीटिंगमध्ये पश्चिम बंगाल आणि झारखंडचे मुख्यमंत्रीदेखील सामील होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीला येण्याची शक्यता फार कमी आहे.

ममता बनर्जींनी पंतप्रधानांना पाठवले पत्र

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्यासाठी कोर्टात रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्यावर विचार करण्याची मागणी केली आहे. यादरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीदेखील केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना परीक्षा रद्द करण्याची अपील केली आहे.

जेईई आणि नीट प्रवेश परीक्षा घेण्यासाठी आमच्यावर विद्यार्थी आणि पालकांचा दबाव- केंद्रीय शिक्षणमंत्री

जेईई आणि नीट प्रवेश परीक्षा ठरल्या वेळेतच होणार आहेत. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून तसं स्पष्टही करण्यात आले आहे. मात्र या परीक्षा घेण्यावरून केंद्र सरकारवर टीका होत आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी या परीक्षा घेण्यावरून मोठा दावा केला आहे. जेईई आणि नीट परीक्षा घेण्यासाठी आमच्यावर दबाव होता असा दावा केंद्रिय शिक्षणमंत्र्यांनी केला आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना

पुढे बोलताना ते म्हणाले की, दरम्यान जेईई आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कऱण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना मास्क, ग्लोव्ह्ज, पाण्याची बाटली आणि सॅनिटायजर सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे, अशी माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. जेईई परीक्षेसाठी सुमारे साडे आठ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील 7 लाख 25 हजार विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड डाउनलोड केल्याची माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.