आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांना राग का येतो? अडवाणींना द्यावे लागले होते स्पष्टीकरण:​​​​​​​स्मृतींसह अनेकांना केले गप्पगार; स्वपक्षीय खासदारांवरही भडकल्या

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यतः शांत दिसणाऱ्या सोनिया गांधी गुरूवारी संसदेत चांगल्याच भडकल्याचे दिसून आल्या. त्यांची व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची तिखट बाचाबाची झाली. यावेळी सोनिया संतापाच्या भरात स्मृतींना ‘माझ्याशी बोलू नको‘ ( डोन्ट टॉक टू मी) असे म्हणाल्या. हे संपूर्ण प्रकरण काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे घडले. अधीर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी‘ म्हणून केला आणि संसदेत महाभारत घडले. स्मृतींनी याविषयी थेट सोनिया गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर भाजपच्या काही महिला खासदार सोनियांना अधीर रंजन यांच्या विधानाविषयी काही प्रश्न विचारत होत्या. त्यावेळी सोनिया व स्मृतींत शाब्दिक चकमक झाली. दोघींत 2-3 मिनिटे बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर सोनिया गांधी तेथून निघून गेल्या.

शांत स्वभावाच्या सोनिया गांधी यांनी यापूर्वीही अनेकदा आपले रौद्र रुप दाखवले आहे. कधी काँग्रेस तर कधी विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांचा राग सहन करावा लागला.

कमी व मृदुभाषी सोनिया गांधी क्वचितच संतापतात. यामुळेच त्यांचा संतापाची बातमी हेडलाइन बनते.
कमी व मृदुभाषी सोनिया गांधी क्वचितच संतापतात. यामुळेच त्यांचा संतापाची बातमी हेडलाइन बनते.

जेव्हा सोनिया भाजप खासदाराला म्हणाल्या -’क्या बोला’

2015 मध्ये फरार उद्योगपती ललित मोदीवर संसदेत चर्चा सुरू होती. त्यावेळी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत होते. तेव्हा भाजपच्या एका खासदाराने काळ्या पैशाच्या मुद्यावर सोनिया गांधींवर आरोप केले. हे ऐकताच सोनिया गांधी नाराज झाल्या. त्यांनी भाजप खासदाराला फैलावर घेत, ’क्या बोला’असे सुनावले. त्यानंतर सोनियांनी थेट वेलमध्ये धाव घेऊन नारेबाजी केली. हे चित्र पाहून विरोधी पक्षांचे खासदारही वेलमध्ये उतरले. त्यानंतर संसदेची कारवाई स्थगित करावी लागली.

अडवाणींना द्यावी लागली होती स्पष्टोक्ती

2012 मध्ये आसाममधील जातीय हिंसाचारावर लोकसभेत चर्चा सुरू होती. यावेळी भाषण देताना भाजपचे अध्वर्यु लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्रातील काँग्रेस सरकारच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही गोष्ट सोनियांच्या मनाला लागली. त्यांनी रागाच्या भरात आपल्या खासदारांना अडवाणींच्या या विधानाचा विरोध करण्याची सूचना केली. प्रारंभी अडवाणी आपल्या विधानावर ठाम राहिले. पण नंतर त्यांना सोनिया व काँग्रेस खासदारांचा रौद्रावतार पाहून स्पष्टीकरण द्यावे लागले.

लालकृष्ण अडवाणी व अधीर रंजन चौधरींसारख्या मोठ्या नेत्यांनाही सोनिया गांधींच्या रोषाला बळी पडावे लागले.
लालकृष्ण अडवाणी व अधीर रंजन चौधरींसारख्या मोठ्या नेत्यांनाही सोनिया गांधींच्या रोषाला बळी पडावे लागले.

जाहिरनाम्यावर राहुल गांधींचे छोटे छायाचित्र पाहून संतापल्या

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर राहुल गांधी यांचे छोटे छायाचित्र लागले होते. यासंबंधीच्या वृत्तानुसार, हे पाहून सोनिया चांगल्याच भडकल्या. त्यांनी यासाठी मेनिफेस्टो कमिटीचे उपप्रमुख व राज्यसभेचे खासदार राजीव गौडा यांना चांगलेच धारेवर धरले. मेनिफेस्टोचे कव्हर बिल्कूल आकर्षक नाही, असे त्या म्हणाल्या.

सभागृहात आपल्याच नेत्याकडे रागाने पाहू लागल्या

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनाही सोनियांचा रोष सहन करावा लागला. एकदा संसदेतील काश्मीरवरील चर्चेत अधीर रंजन चौधरी यांनी सरकारला विचारले की, 'काश्मीरचा मुद्दा बायलॅटरल म्हणजे द्विपक्षीय आहे का?' त्यांचा हा प्रश्न त्यांच्या बाजूला बसलेल्या सोनिया गांधींना कदापी आवडला नाही. त्या अधीर रंजन चौधरींकडे रागाने पाहू लागल्या. यावेळी त्यांनी आपल्या बाजूला बसलेल्या काँग्रेसच्या इतर खासदारांकडेही याविषयी इशाऱ्याने नाराजी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...