आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनिया गांधींची प्रकृती बिघडली:कोरोना संसर्गामुळे दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात भरती, तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाची प्रकृतीवर नजर

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्याचा अहवाल अद्याप निगेटीव्ह आला नाही. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी त्यांना दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. उल्लेखनीय बाब म्हणजे ED ने 23 जून रोजी नॅश्नल हेराल्ड प्रकरणी सोनिया व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचा समंज बजावला आहे. यापूर्वी 9 जून रोजी त्यांना हजर व्हावयाचे होते. पण, कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांना वाढीव मुदत देण्यात आली आहे.

सुरजेवाला म्हणाले -प्रकृती स्थिर

75 वर्षीय सोनिया गांधी यांना गत 2 जून रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पण, अचानक त्यांची प्रकृती बिघडली. सुरजेवाला यांनी सांगितले की, "सोनिया गांधींना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पण, प्रकृती खालावल्याने त्यांना आज सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले."

सोनियांनंतर प्रियंकांनाही संसर्ग

काँग्रेस सरचिटणीस तथा उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधींनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः एका ट्विटद्वारे याची पुष्टी केली आहे. त्या म्हणाल्या -माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच आपली कोरोना टेस्ट करुन योग्य ती खबरदारी घ्यावी. प्रियंका संक्रमित होण्यापूर्वी लखनऊतील पक्षाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांचा रिपोर्ट सोनिया गांधींनंतर पॉझिटीव्ह आला.

राहुल गांधींची उद्या चौकशी

नॅश्नल हेराल्ड प्रकरणी ईडी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 13 जून रोजी चौकशी करणार आहे. ईडीने यापूर्वी त्यांना 2 जून रोजी हजर राहण्याचा समंस बजावला होता. पण, त्यावेळी ते भारतात नव्हते. त्यानंतर तपास यंत्रणेने त्यांना उद्या चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, काँग्रेस रविवारी या प्रकरणी देशभर निदर्शने व पत्रकार परिषदा घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...