आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनियांचे पत्र:जनहितासाठी पेट्रोल डीझेलची दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, सोनिया गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कच्च्या तेलाचे दर निच्चांकी असताना भारतात इंधन दरवाढीचा निर्णय असंवेदनशील -सोनिया गांधी

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मंगळवारी पत्र पाठवले आहे. कोरोना व्हायरस आणि इतर कारणांमुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या किमती निच्चांकी स्तरावर गेल्या. तरीही भारत सरकारने पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय धक्कादायक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहित लक्षात घेऊन इंधन दरवाढीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्रातून केली आहे. कच्च्या तेलाचे दर इतके कमी झाले असताना सरकारला त्याचा प्रचंड नफा होत आहे. तरीही जनतेला याचा फायदा मिळवून देण्यापेक्षा त्यांच्यावरच ओझे का टाकले जात आहे हे कळत नाही असेही सोनिया गांधींनी लिहिले आहे.

सोनिया गांधींनी सांगितल्याप्रमाणे, पेट्रोल आणि डीझेल दरवाढीचा निर्णय एक असंवेदनशील निर्णय आहे. जनतेच्या हितांना वाळीत ठेवून सरकार स्वतःचा फायदा करून घेत आहे. एक्साइस शुल्क दिवसेंदिवस वाढवले जात आहे त्यासोबतच इंधन दरवाढ करून सरकार अतिरिक्त 2.6 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल गोळा करू पाहत आहे. देशातील जनता अतिशय वाइट परिस्थितीला सामोरे जात आहे. कोराना संकटात लोक घाबरलेले आहेत. वाढत्या समस्यांमुळे त्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. इंधन दरवाढ करण्यात काहीच औचित्य नाही. यामुळे, विनाकारण देशाच्या जनतेच्या पाठीवर ओझे वाढवले जात आहे. सरकारने अशा परिस्थितीत लोकांना दिलासा देणारे निर्णय घ्यायला हवे. जनतेचा ताण कमी कसा होईल यावर लक्ष केंद्रित करायला हवे. पण, उलट सरकार जनतेला संकटात टाकत असल्याचे चित्र आहे असेही काँग्रेसने म्हटले आहे.

कोरोना संकटाच्या काळात पेट्रोल आणि डीझेलची दरवाढ सलग 10 व्या दिवशी सुरूच आहे. यात मंगळवारपर्यंत पेट्रोलचे दर 5.47 रुपये प्रति लिटर आणि डीझेलचे दर प्रति लिटर 5.8 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या एका भाषणात जनतेला आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला होता. सोनिया गांधींच्या मते, जनतेला खरंच आत्मनिर्भर करायचे असेल तर त्यांच्या मार्गात येणारे आर्थिक अडथळे सरकारने दूर करावे. या कठिण समयी सरकारने आपली संपूर्ण ताकद पणाला लावून थेट जनतेच्या हातात पैसा कसा पोहोचेल याची व्यवस्था करावी. दिवसेंदिवस होणारी दरवाढ त्यांचा भार वाढवण्याशिवाय काहीच करणार नाही.

बातम्या आणखी आहेत...