आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonia Gandhi's Application For Extension To ED For Attendance, National Herald Case: Appearance To Be Made Today

मुदतवाढीचा अर्ज:सोनिया गांधींचा हजेरीसाठी ईडीकडे मुदतवाढीचा अर्ज, नॅशनल हेराल्ड प्रकरण : आज व्हायचे होते हजर

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) चौकशीस हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात त्यांना चौकशीसाठी समन्स जारी झाले आहेत. सोनियांनी बुधवारी ईडीला पत्र लिहून म्हटले की, आजारातून पूर्णपणे बरे होईपर्यंत हजर राहण्याची तारीख पुढील काही आठवड्यांपर्यंत वाढवण्यात यावी. ईडीने २३ जूनला त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, ‘कोविड आणि फुप्फुसातील संसर्गामुळे डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. कोविडशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे सोनियांना अलीकडेच दिल्लीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथून त्यांना सोमवारी सायंकाळी सुटी मिळाली होती.’ या प्रकरणात ईडीने राहुल गांधी यांची पाच दिवसांत ५० तासांपेक्षा जास्त काळ चौकशी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...