आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonia Gandhi's Letter To ED, The Trial Is Set To Begin On June 23 In The National Herald

सोनिया गांधींचे ईडीला पत्र:नॅशनल हेराल्ड प्रकरणात मागितला आणखी वेळ, 23 जूनला चौकशी

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करू इच्छित आहे. यासाठी 23 जून रोजी सोनिया गांधी यांना ईडीने कार्यालयात बोलावले होते. मात्र सोनिया गांधी यांनी ईडीच्या चौकशीसाठी आणखी वेळ मागितला आहे. यासाठी त्यांनी पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा हवाला दिला आहे.

डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला - जयराम रमेश

जयराम रमेश यांनी ट्विट केले की, सोनिया गांधी यांना डॉक्टरांनी घरी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे त्यांनी ईडीला पत्र लिहून आपण पूर्ण बरे होईपर्यंत हजर होण्याची तारीख वाढवण्याची मागणी केली आहे.

20 जून रोजी रुग्णालयातून सुट्टी

सोनिया गांधी सोमवारीच रुग्णालयातून घरी परतल्या. कोरोनामुळे झालेल्या त्रासामुळे त्यांना १२ जून रोजी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 75 वर्षीय सोनिया गांधी यांना 2 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.

श्वसन नलिकेत संसर्ग

कोरोनामधून बरे झाल्यानंतर सोनिया गांधी यांना श्वसन नलिकेचा संसर्ग झाला होता. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी सांगितले, त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे १२ जून रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर श्वसन नलिकेच्या खालच्या भागातही बुरशीजन्य संसर्ग आढळून आला.

ईडीने 23 जून रोजी बोलावले

नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात ईडीने सोनियांना ८ जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी तपास यंत्रणेकडे थोडा वेळ मागितला होता. यानंतर ईडीने त्याला 23 जूनला हजर राहण्यास सांगितले आहे. आता त्यांनी ईडीकडे पुन्हा एकदा तारीख वाढवण्याची विनंती केली आहे.

काँग्रेसने केंद्रावर केले आरोप

या प्रकरणी ईडीने गेल्या 5 दिवसांत राहुल गांधींची 50 तास चौकशी केली. दुसरीकडे, काँग्रेसने विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केंद्रावर केला आहे आणि संपूर्ण कारवाईला राजकीय सूड असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...