आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट पुन्हा आपल्याच सरकारविरुद्ध बंड करताना दिसतील. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले. २५ सप्टेंबरच्या घटनेला विश्वासघात म्हटले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकल्यानंतर वाटते की, त्यांच्या नेत्या सोनिया गांधी नव्हे, तर वसुंधराराजे आहेत. एकीकडे म्हटले जात आहे की, भाजप आमचे सरकार पाडणार होता. दुसरीकडे म्हटले जाते की, सरकार वाचवण्याचे काम वसुंधरा करत होत्या. हा विरोधाभास समजून घेतला पाहिजे. सचिन यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. याच दिवशी राहुल गांधी राजस्थानात होते आणि बुधवारी कर्नाटकात मतदान होणार आहे. सचिन पायलट हेदेखील म्हणाले की, मी ११ मेपासून पेपर लीक प्रकरणी अजमेर ते जयपूरपर्यंत १२५ किमी ५ दिवसांची जनसंघर्ष पदयात्रा काढणार आहे. ही यात्रा सरकारच्या नव्हे, तर भ्रष्टाचाराविरुद्ध आहे.
नेतृत्व बदल हवा होता..
पायलट पुढे म्हणाले, सन २०२० मध्ये माझ्यावरील राष्ट्रद्रोहाच्या खटल्यात कारवाई करण्याचा प्रयत्न झाला. मी व सहकाऱ्यांना नेतृत्वात बदल हवा होता. त्यासाठी आम्ही दिल्लीलाही गेलो होतो. त्यानंतर आम्ही काँग्रेस आणखी बळकट होण्यासाठी काम केले. अडीच वर्षांच्या काळात शिस्त मोडली नाही.
पायलट म्हणाले, दीड वर्षापासून मी पत्र पाठवत आहे. वसुंधराराजेंच्या काळात अनेक गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी उपोषण केले. चौकशी का नाही केली, हे आता कळले आहे. कारवाई का होत नाही व का होणार नाही, हेही स्पष्ट आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.