आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonia's Health Deteriorated Due To Corona; ED Summons Rahul To Appear In Hospital Today

ईडीचे समन्स:कोरोनामुळे सोनियांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल; राहुल यांना आज चौकशीस बोलावले

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी कोरोनाशी संबंधित समस्येमुळे खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना ८ जून रोजी हजर होण्यास सांगितले होते. परंतु कोरोना संसर्गामुळे त्यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. आता त्यांना २३ जून रोजी बोलावण्यात आले आहे. याच प्रकरणात राहुल गांधी यांनाही समन्स बजावण्यात आले. त्यांना १३ जूनला चौकशीसाठी बोलावले आहे.

ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी केंद्रावर आरोप करत म्हटले की, ते सरकारी संस्थांचा दुरुपयोग करत आहेत. राहुल गांधी यांच्या चौकशीच्या दिवशी काँग्रेस दिल्लीसह देशभरातील ईडी कार्यालयांसमोर सत्याग्रह करेल. तसेच दिल्लीत ईडी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल. तपास संस्थेच्या २५ कार्यालयांबाहेर काँग्रेस नेते निदर्शने करतील. सोनिया गांधी व राहुल गांधी यांना कट रचून या प्रकरणात फसवले जात आहे, असा काँग्रेस पक्षाचा आरोप आहे.

बातम्या आणखी आहेत...