आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलह चव्हाट्यावर:सोनियांचा राजीनाम्याचा प्रस्ताव शक्य, काँग्रेसची आज बैठक; जी-23 गट पुन्हा सक्रिय होत असल्याची चर्चा

नवी दिल्ली | मुकेश कौशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभांच्या निवडणूक निकालामुळे काँग्रेसअंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पंजाबमध्ये सत्ता गमावणे, उत्तराखंड आणि गोव्यात सत्ता मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्याने गांधी परिवाराला धक्का बसला आहे. त्याचबरोबर पक्षात लोकशाही आणण्यासाठी धडपडणारा गटही निराशेत बुडाल्यासारखी स्थिती आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसमधील जी-२३ गट पुन्हा सक्रिय होत असल्याची चर्चा सुरू आहे. म्हणूनच परिस्थिती लक्षात घेऊन हायकमांडने रविवारी सकाळी दहा वाजता स्ट्रॅटेजी ग्रुपची बैठक आयोजित केली आहे. वास्तविक अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या भागाचा विचार करण्यासाठी ही बैठक प्रस्तावित होती. परंतु त्याच दिवशी दुपारी कार्यकारी समितीचीही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कार्यकारी समितीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आपला राजीनाम्याचा प्रस्ताव मांडू शकतात, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. असा प्रस्ताव मांडून त्या निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारीही घेतील. कदाचित राहुल गांधी यांच्याकडे सूत्रे दिली जाऊ शकतात. पंजाबमधील निकालावरून त्यांच्यावर टीका होऊ शकते. कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा अपमान होऊन त्यांना मिळालेला निरोप हे पंजाबमधील पराभवाचे महत्त्वाचे कारण आहे. त्यानंतर मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी व नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील संघर्ष हेदेखील पराभवाचे आणखी एक कारण मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...