आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वे खाते आपल्या विविध विभागांतर्गत थेट भरतीत अग्निवीरांना अराजपत्रित पदांवर १५% आरक्षण देणार आहे. इतकेच नव्हे तर रेल्वे सुरक्षा दलातील अनेक पदांच्या भरती प्रक्रियेत (आरपीएफ) अग्निवीरांसाठी आरक्षणावर गांभीर्याने विचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत भारतीय रेल्वे बोर्डाने आपल्या सर्व महाव्यवस्थापकांना पत्र लिहून अग्निवीरांत भरतीत सवलत देण्यास सांगितले आहे.
केंद्र सरकारकडून गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ भरती योजनेंतर्गत ४ वर्षांच्या सेवाचा अवधी अबाधितपणे पूर्ण झाल्यानंतर २५% भरतीत अग्निवीरांचा समावेश होईल. अनेक केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे व उद्योग संस्था समान नोकरी आरक्षण योजनेच्या माध्यमातून माजी अग्निवीरांचा पर्याय देत आहेत.
आपल्या सेवेचा अवधी पूर्ण करणारे अग्निवीर अराजपत्रित वेतन ग्रेडमध्ये भरतीसाठी रेल्वे भरती संस्थांकडून जारी रोजगार अधिसूचनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. रेल्वे बोर्डाने महाव्यवस्थापकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, रिक्त असलेल्या जागा पुढे वाढवण्यात येणार नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.