आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sopore Encounter News Update|3 Year Old Boy Saved By Jawan In Jammu And Kashmir Sopore District

मुलाला वाचवण्याऱ्या जवानाची आंखों देखी:सर्व बाजूंनी गोळीबार होत होता, दहशतवादी मशिदीच्या वरच्या मजल्यावरून गोळ्या चालवत होते; मुलाला वाचविणे आव्हानात्मक होते

श्रीनंगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी सोपोर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुटका केलेला निर्दोष आता त्याच्या कुटूंबियांकडे पोहोचला आहे. - (सर्व फोटो: आबिद बट)
  • दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकाच्या नातूची सुरक्षा दलाने केली सुटका

काश्मीरमधील सोपोर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकला थोडक्यात बचावला. आता तो सुरक्षित असून आपल्या आईवडिलांकडे आहे. दरम्यान या हल्ल्यात त्याच्या आजोबाचा मृत्यू झाला. 

हा मुलगा गोळीबारादरम्यान आजोबाच्या मृतदेहाजवळ रडत बसला होता. सुरक्षा दलाच्या एका जवानाने त्याला तेथून सुखरूप बाहेर काढले. वय लहान असल्यामुळे या मुलाला मृत्यू, वेदना यांसारखा भावना त्याला माहीत नाहीत. आपल्या विश्वात तो सध्या हसत आहे. पण जेव्हा सर्वत्र गोळ्या चालत होत्या तेव्हा या मुलाला वाचविणे खूप आव्हानात्मक होते.

दहशतवाद्यांची नजर हटवण्यासाठी गाड्या लावल्या  - सुरक्षा दल

सुरक्षा दलातील जवान इम्तियाज हुसैनने सांगितले की, सुरक्षा दलाचे आमचे तीन सैनिक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आम्हाला त्यांना वाचवायचे होते. तेव्हा एका नागरिकाला देखील तेथून बाहेर काढायचे होते. तो देखील जखमी होता. आम्हाला सर्वाधिक विचलित करणारे दृष्य तेव्हा होते जेव्हा आम्ही एक अडीच-तीन वर्षाच्या मुलास तिथे रडत फिरताना पाहिले.

त्यावेळी समोरच्या बाजूने गोळीबार होत होता. अतिरेकी मशीदीच्या वरच्या मजल्यावरून गोळीबार करत होते. आमच्यासमोर पहिलं आव्हान म्हणजे दहशतवाद्यांची नजर तेथून हटवणे होते. जेणेकरून तिथून मुलाला काढता येईल. यानंतर आम्ही सर्व वाहने तेथे लावली. 

हे आमच्यासाठी आव्हानात्मक होते. मुलगा आपल्या आजोबासोबत कारमधून जात होता. समोर गोळीबार झाल्यानतंर आमचे तीन जवान जखमी झाले आणि गाडीतून जाणाऱ्या मुलाच्या आजोबाला गोळी लागली. त्यावेळी अनेक लोक आपल्या गाड्यासोबत सुरक्षित ठिकाणी निघून गेले. 

कुटुंबासह तीन वर्षांचा चिमुकला.
सुरक्षा दलाने ज्या मुलाला वाचवले तो आता त्याच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत आहे.
मुलगा सुरक्षितपणे घरी पोचल्यावर महिलेने अशाप्रकारे त्याची काळजी घेतली.
मुलगा वाचला, परंतु आजोबांच्या मृत्यूमुळे सर्वजण दुःखात बुडाले.
दहशतवादी हल्ल्यात आपल्या माणसाला गमावल्यानंतर, या मुलीला आणि महिलेला अश्रू अनावर झाले होते.
दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकाच्या अंत्यसंस्कारात सहभागी लोक.
हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकाला अखेरचा निरोप देताना लोक.
0