आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sopore Terror Attack Photos | CRPF Latest News; Jammu Kashmir (Sopore) Terrorists Attack News Updates In Pictures

मानवता:काश्मीरात दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत आजोबांच्या देहावर बसून होता चिमुकला नातू; सैनिकाने वाचवला मुलाचा जीव

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

जम्मू काश्मीरच्या बारापुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे चकमकीदरम्यान एक हृदयविकारक चित्र पाहायला मिळाले. येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या गोळीबारात एक वयोवृद्ध व्यक्ती आणि त्याचा चिमुकला नातू देखील अडकले.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये आजोबांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळावरील काही छायाचित्रे समोर आली. त्यामध्ये तो चिमुकला आपल्या आजोबांच्या मृतदेहावर बसलेला दिसून आला. तो कधी आजोबांवर बसायचा तर कधी आसपास फिरायचा. याच दरम्यान, घटनास्थळी असलेल्या जवानांनी त्या चिमुकल्याचा जीव वाचवला.

फायरिंग सुरू असताना लहान मुलगा आपल्या आजोबांच्या छातीवर बसून होता.

घटनास्थळी असलेल्या एका जवानाने त्या मुलाला सुखरूप हटवले. या दरम्यान, तो जवान मुलाशी बोलत होता.

जवानानेच त्या मुलाला गाडीत बसवले आणि सुरक्षित स्थळी हलवले.

चिमुकला घाबरू नये म्हणून त्याला खाऊ देखील देण्यात आले.

Advertisement
0