आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • SOPs Issued For Resuming Production Of Films And TV Serials, Says Information And Broadcasting Minister Prakash Javadekar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळात चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी:कॅमेरा फेस करणाऱ्या कलाकारांव्यतिरिक्त इतर सर्वांना मास्क अनिवार्य, ठेवावे लागणार 6 फूटांचे अंतर

3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • तिकिट बुकिंगसारखे काम केवळ ऑनलाइन करण्याची परवानगी
 • जास्त रिस्क असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून फ्रंटलाइनचे काम करुन घेतले जाणार नाहीत

सरकारने कोरोना काळात चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांच्या शूटिंगसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॉसिजर (एसओपी) जारी केले आहे. कॅमेरा फेस करणाऱ्या कलाकारांव्यतिरिक्त शूटिंगसंबंधीत काम करणाऱ्या लोकांना पब्लिक आणि वर्कप्लेसवर मास्क घालणे गरजेचे असणार आहे. एकमेकांपासून कमीत कमी सहा फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. जास्त रिस्क असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पब्लिक कॉन्टॅक्टच्या फ्रंटलाइन कामांमध्ये घेतले जाणार नाही.

शूटिंग करताना करावे लागणार या अटींचे पालन

 1. जास्त रिस्क असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिररिक्त सावधगिरी बाळगावी लागेल. त्यांना पब्लिक कॉन्टॅक्टच्या फ्रंटलाइन कामांमध्ये घेऊ नये असे सांगितले आहे.
 2. कामाच्या ठिकाणी आणि बाहेर सर्व ठिकाणी मास्क घालणे आवश्यक असेल.
 3. वारंवार हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हँड सॅनिटायझरचा वापर करावा. एंट्री पॉइंट आणि कामाच्या परिसरात थूंकण्यास मनाई असेल.
 4. रेस्पायरेटरी अटीकेट्सचे कठोर पालन करावे लागेल.
 5. आरोग्य सेतु अॅपच्या वापराचा सल्ला देण्यात आला आहे.
 6. एंट्री पॉइंट्सवर थर्म स्क्रीनिंगची व्यवस्था करावी लागेल. केवळ लक्षण नसलेल्या लोकांनाच आत जाण्याची परवानगी मिळेल.
 7. पार्किंगमध्ये आणि शूटिंग कँपसच्या बाहेरही सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल.
 8. कँपसच्या आत सोशल डिस्टेंसिंग ठेवण्यासाठी मार्किंग करावी लागेल.
 9. कोरोनापासून बचाव करणाच्या उपायांसाठी पोस्टर, स्टँडी किंवा ऑडियो-विज्युअल मीडियाचा आधार घेतला जाऊ शकतो.
 10. सोशल डिस्टेंसिंगसह सिटिंग अरेंजमेंट करावे लागेल.
 11. तिकिट बुकिंगसारख्या कामांसाठी कॉन्टॅक्ट ट्रान्जेक्शनच परवानगी नसेल. ऑनलाइन बुकिंग, ई-वॉलेट आणि क्यूआर कोड स्कॅनरचा वापर करता येईल.
 12. वर्कप्लेस आणि कॉमन फॅसिलिटीजमध्ये वारंवार सॅनिटायजेशन करावे लागेल.
 13. कुणी पॉझिटिव्ह आढळले तर पूर्ण कँपसमध्ये डिसइंफेक्शन करुन घ्यावे लागेल.
 14. सर्वांना स्वतःच्या आरोग्यावर स्वतः नजर ठेवावी लागेल, कोणतीही अडचण असेल तर लवकरात लवकर सांगावी लागेल.
 15. कुणी संशयित आढळले तर त्यांना अस्थाई स्वरुपात आयसोलेट करावे लागेल.
 16. शूटिंग लोकेशंस, रेकॉर्ड स्टूजियो आणि एडिटिंग रुममध्ये एकमेकांपासून सहा फूट अंतर ठेवावे लागेल.
 17. शूटिंगच्या वेळी कमीत कमी स्टारकास्ट आणि क्रू मेंबरर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 18. सेटवर व्हिडिचर आणि प्रेक्षकांना येण्याची सूट नाही.
 19. आउटडोर शूटिंगच्या वेळी प्रेक्षकांना मॅनेज करण्यासाठी लोकल अथॉरिटीजकडून को-ऑर्डिनेशन करावे लागेल.
 20. शूटिंग लोकेशंससाठी वेगळे एंट्री आणि एग्जिट पॉइंट बनवावे लागलीत.
 21. सेट, मेक-अप रुम, वॅनिटी वॅन आणि वॉशरुममध्ये नियमित सॅनिटायजेशन करावे लागेल.
 22. परिपूर्ण ग्लोव्ह्ज, बूट, मास्क आणि पीपीई किट ठेवावे लागतील. जास्त जोखिम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागेल. त्यांना पब्लिक कॉन्टॅक्टच्या फ्रंटलाइन कामांमध्ये लावू नये असे सांगण्यात आले आहे.