आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोरेन यांची आमदारकी अद्याप कायम:राज्‍यपालांचा आदेश नाही, आयोग अधिसूचना जारी करेल

रांची3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरुद्ध लाभाच्या पद प्रकरणात निवडणूक आयोगाचे मत कळल्याच्या दुसऱ्या दिवशीही राज्यपाल रमेश बैस यांनी कोणताही आदेश जारी केला नाही. ते यावर निर्णय घेऊन तो परत आयोगाकडे पाठवतील. यानंतर आयोग अधिसूचना जारी करेल. यानंतर तो राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल.

मुख्य निवडणूक अधिकारीच विधानसभा अध्यक्ष व सोरेन यांना आदेश देतील. यानंतर विधानसभा अध्यक्ष सोरेन यांची विधानसभेची जागा रिक्त झाल्याचा आदेश देतील. या संपूर्ण प्रक्रियेत तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे. भाजपने सोरेन यांच्याविरुद्ध खाण लीजवर घेतल्याची तक्रार देऊन आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...