आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sourav Ganguly Met West Bengal Governor Jagdeep Dhankhar, Amid Speculation Of Him Joining Politics

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम बंगालमध्ये नवीन समीकरण:सौरव गांगुलीने बंगालच्या राज्यपालांची भेट घेतली, भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण

कोलकाता4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण तापले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रविवारी संध्याकाळी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये 1 तास चर्चा झाली. या बैठकीनंतर गांगुली भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र ही शिष्टाचार(कर्टसी) बैठक होती असे राजभवनाशी संबंधित सूत्रांनी सांगितले. राज्यपाल म्हणाले की, गांगुलीसोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांनी ईडन गार्डन्स मैदान पाहण्याचे आमंत्रण दिले होते, ते स्वीकारले आहे.

बंगालमधील निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण तापले

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधीच राजकीय वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत तृणमूलचे बंडखोर शुभेंदु यांच्यासोबत 10 आमदार भाजपत सामिल झाले होते. दुसरीकडे भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...