आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Spanish Flu History Timeline Or Bombay Fever; Mumbai News | How Many Died In Spanish Flu? 1918 Flu Death Records In India; News And Live Updates

महामारी 104 वर्षांपूर्वीची:1918 मध्ये आलेल्या 'स्पॅनिश फ्लू'मुळे 5 कोटी लोकांचा मृत्यू; जगातील प्रत्येक तिसरी व्यक्ती होती संक्रमित

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्पॅनिश फ्लू या महामारीला भारतात बॉम्बे फ्लू या नावानेदेखील ओळखले जात होते.

संपूर्ण जग आज कोरोनाशी लढत आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत जगात लाखो लोक संक्रमित आढळत आहे. कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने आज संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे जगातील कित्येक देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. यासोबतच बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि अत्यावश्यक औषधांचा तुडवडा भासत आहे. भारतासारखे मोठे देश आज कोरोनाशी लडत आहे. परंतु, ही सर्व महामारी जगाला किंवा भारताला नवीन नाही. कारण अशीच एक महामारी 1918 मध्ये आली होती. या महामारीचे नाव 'स्पॅनिश फ्लू' होते. दरम्यान, या महामारीमुळे त्याकाळात 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होतो.

'स्पॅनिश फ्लू' ही महामारी जगात 104 वर्षांपूर्वी आली होती. त्यावेळेस जगाची लोकसंख्या 180 कोटीच्या आसपास होती. दरम्यान, दोन वर्षांत या महामारीच्या विळ्याख्यात 60 कोटी लोक आले होते. विशेष म्हणजे या महामारीमुळे जगातील प्रत्येक तिसरी व्यक्ती संक्रमित होती. तर दुसरीकडे, यामुळे किती लोक मरण पावले आहे याचा अंदाजा आतापर्यंत लागलेला नाही.

5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता
स्पॅनिश फ्लू या महामारीला भारतात बॉम्बे फ्लू या नावानेदेखील ओळखले जात होते. या साथीमुळे सर्वात जास्त मरणार्‍यांची संख्या भारतातील होती. दरम्यान, जगभरात यामुळे दोन कोटी लोक मरण पावले होते.

बातम्या आणखी आहेत...