आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संसदेचे लेखी कामकाज जास्तीत जास्त ‘मर्यादित’ करण्यावर दोन्ही सभागृहांचे सभापती जास्त भर देत आहेत. यामुळेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात असभ्य टोमणे, सदस्य नसलेल्याचे नाव घेण्याऐवजी नात्यांवरून इंगित करणे, फिरवून आक्षेप घेणे, राज्य सरकारांना संसदेच्या कामकाजात ओढणे यासारख्या बाबतीत ‘झीरो टॉलरन्स’चे धोरण स्वीकारले जात आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या भागात ‘बालबुद्धी खासदार’ शब्दाला असंसदीय ठरवण्यात आले. या शब्दाचा वापर खासदारांचा उपमर्द करण्यासाठी करण्यात आला होता. १६ व्या लोकसभेत तत्कालीन सभापती सुमित्रा महाजन यांनी ‘पप्पू’ शब्दावर अनौपचारिक बंदी घातली होती. १७ व्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी त्याचा समावेश असंसदीय शब्दांच्या यादीत केला. दोन्ही सभागृहांचे कामकाज लेखी स्वरूपात नोंदवणाऱ्या संबंधित विभागाला कामकाजातून अमर्यादीत शब्द हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खासदारच नव्हे वरिष्ठ मंत्र्यांचेही असंसदीय, विनाकारण, नियमबाह्य वक्तव्य हटवले जात आहे.
सर्वाधिक आठ वेळा हटवला भाऊजी
एखाद्या विशेष कुटुंबाला लक्ष्य केल्याने ‘कुटुंब’ शब्दही कामकाजातून हटवण्यात आला. एखाद्या सीएमचे नाव न घेता ‘दीदी’ वा ‘दादा’ सारख्या शब्दांच्या वापरासही असंसदीय म्हटले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वाधिक आठ वेळा भाऊजी शब्द हटवण्यात आला. तर जावई, बहीण आणि दीदीलाही हटवण्यात आले. टोमणा मारण्यासाठी कुटुंब, एकच कुटुंब, भाऊजी, दोन मुले, दीदीसारखे शब्द आक्षेपार्ह, अशोभनीय व संसदीय मर्यादेच्या विपरीत शब्द हटवण्यात आले आहे. ‘अडाणी खासदार’ आणि ‘अंगठेबहाद्दर खासदार’ही असंसदीय यादीत टाकण्यात आले आहे.
२००० पानांचा झाला असंसदीय शब्द, टोमण्यांचा संग्रह
संसदेत त्या व्यक्ती, संघटना, संस्थांची नावे घ्यायची परवानगी नाही, जे सभागृहाचे सदस्य नाहीत आणि त्यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी उपस्थित नसतात. असंसदीय शब्द आणि टोमण्यांचा ११३४ पानांचा पहिला संग्रह २००९- १० मध्ये प्रकाशित झाला होता. पाच वर्षांनी तो अपडेट केल्याने त्याच्या पानांची संख्या २००० च्या जवळ पाेहोचली. आता त्याचा नवा संग्रहही आणण्याची तयारी आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.