आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 13 Women Win In Punjab Assembly Elections, 10 First Time Admissions, 2 Doctors Included | Marathi News

दिव्य मराठी विश्लेषण:स्पेशल-13... पंजाब विधानसभा निवडणुकीत 13 महिलांचा विजय, 10 प्रथमच दाखल, 2 डॉक्टरचा समावेश

जालंधर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदा सर्वाधिक 12 जणींना आम आदमी पार्टीने तिकीट दिले

पंजाबच्या १६ व्या विधानसभेत या वेळी प्रथमच १३ महिला निवडून आल्या. गेल्या विधानसभेत फक्त ६ महिला होत्या. यंदा महिला आमदारांची संख्या दुप्पट झाली आहे. १० महिला प्रथमच, तीन दुसऱ्यांदा विधानसभेत दाखल झाल्या आहेत. विजयी महिला उमेदवारांत ११ आम आदमी पार्टीच्या आणि शिअद-काँग्रेसच्या प्रत्येकी १ महिला निवडून आल्या. १३ पैकी दोन आमदार महिला डॉक्टर असून ९ पदवीधर, १ आयटीआय आणि एक १२वी उत्तीर्ण आहे. मजिठातून विजयी झालेल्या बिक्रमसिंग मजिठिया यांची पत्नी गनवी कौर यांच्याकडे १२.०७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर, संगरूरहून विजयी झालेल्या नरिंदर कौर भराज यांच्याकडे फक्त २४ हजार रुपये संपत्ती आहे. २७ वर्षीय नरिंदर कौर सर्वात तरुण आमदार असून निवडणुकीत एकूण ९० महिला उमेदवार होत्या. सर्वाधिक १२ महिलांना ‘आप’ ने तिकिटे दिली होती.

बातम्या आणखी आहेत...