आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Special Costumes From Banke Bihari For Ramallah, Abir Gulal From Jagannath, Flags Too

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवधमध्ये फागोत्सव:रामलल्लासाठी बांके बिहारीकडून विशेष पोशाख, तर जगन्नाथ यांच्याकडून अबीर-गुलाल, ध्वजही

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • होळीनिमित्त जगन्नाथपुरीसोबत नव्या नात्याची जुळणी

अयोध्येत या वेळी रामलल्लांची होळी विशेष असेल. मागील वर्षापासून सुरू झालेल्या परंपरेचे पालन करत वृंदावनच्या बांके बिहारीजींच्या वतीने त्यांच्यासाठी खास मोरपंखी रंगाचा पोशाख व पिवळा गुलाल पाठवला आहे. तर, प्रथमच पुरीहून भगवान जगन्नाथजींनी रामलला यांना अबीर- गुलाल, वस्त्र, जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर फडकणारा ध्वज पाठवला आहे.

रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी सांगितले, या वेळी अनेक मंदिरांकडून रामलल्लांना रंग-गुलाल भेट म्हणून आले आहे. गेल्या वर्षी बांके बिहारीजींकडून पाठवलेल्या रंगाने रामलल्ला विराजमान पहिली होळी खेळले आणि या वेळी बिहारीजींनी रंगासोबत पोशाख पाठवला आहे. बांके बिहारी मंदिराचे सेवेकरी गोपी गोस्वामींनी सांगितले, ब्रजमध्ये ठाकूरजी ४० दिवस होळी खेळतात, तर आमच्य रामलल्लांनी एक दिवस तरी होळीच्या रंगात रंगावे. रामलल्लांना कृष्णाचे रूप घेऊन होळी खेळतील. दर्शनासाठी येणाऱ्यांना गुलालाचा टिळा लावला जाईल. जगन्नाथपुरीचे मुख्य पुजारी जनार्दन पट्टाजोशी महापात्रांनी सांगितले, पुरीत होळीनिमित्त उत्सवात भगवान जगन्नाथ भूदेवी, श्रीदेवीसोबत होळी खेळतात. जगन्नाथजींच्या वतीने रामलला व त्यांच्या परिकरसाठी अबीर-गुलाल, वस्त्रे भेट दिली आहेत.

बातम्या आणखी आहेत...