आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालॉकडाउनदरम्यान देशातील अनेक भागात अडकलेल्या नागरिकांसाठी केंद्र विशेष ट्रेन्स सुरु करण्यावर विचार करत आहे. देशभरात अडकलेले प्रवासी मजुर, विद्यार्थी आणि पर्यटकांना बसमधून त्यांच्या घरापर्यंत पाठवण्यात येत असलेल्या त्रासामुळे हा निर्णय घेतला जाण्यावर विचार सुरू आहे.
यापूर्वीच पंजाब, महाराष्ट्र, बिहार, तेलंगाणा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशल ट्रेन्स सुरू करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, संक्रमण पसरण्याच्या भीतीने लाखो लोकांना बसमधून नेणे कठीण आहे. यामुळे खूप वेळ लागू शकतो आणि लांब पल्ल्यांच्या ठिकाणावर पोहचणे अवघड जाऊ शकते.
दोन राज्यांमध्ये पॉइंट टू पॉइंट ट्रेन सुरू होण्याची शक्यता
सरकारी सूत्रांनी सांगितले की, पंतप्रदान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह, रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि इतर मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अडकलेल्या नागरिकांना आपापल्या गावी पोहचवण्याबाबत चर्चा झाली. गृह मंत्रालय यावर लवकर निर्णय घेणार. रेल्वे मंत्रालयाने यासंबंधी एक योजना तयार केली आहे. या योजने अंतर्गत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पॉइंट टू पॉइंट रेल्वे चालवली जाऊ शकते.
राज्यांनी रेल्वे झोनला रिक्वेस्ट पाठवल्या
रेल्वे बोर्डाचे एग्जीक्यूटिव डायरेक्टर आरडी वाजपेयी यांनी सांगितले की, राज्य सरकारांनी रेल्वेच्या काही झोनला रिक्वेस्ट पाठवल्या आहेत. यात म्हटले की, प्रवासी मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पाठवण्यासाठी स्पेशल ट्रेन चालवल्या जाव्यात. परंतू, राज्यांच्या या विनंतीवर अद्याप रेल्वेकडून कोणतेच उत्तर आले नाही.
रिकव्हरी रेटमध्ये 10 टक्क्यांची वाढ
देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संक्रमण थांबवण्यात यश आले आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, मागील 24 तासात नवीन 1993 प्रकरणे समोर आली आहेत, तर 564 रुग्ण ठीक झाले आहेत. देशात आतापर्यंत 8 हजार 888 संक्रमित रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. एका दिवसात रिकव्हरी रेटमध्ये 10 टक्के वाढ होऊन, 35.37 टक्के झाला आहे. गुरुवारी हा 25.19% होता.
कोरोनामुळे मृत्यू दर 3.2, सर्वात जास्त पुरुषांचा मृत्यू
अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, कोरोनामुळे मृत्यू दर इतर देशांच्या तुलनेत खूप कमी आहे. येथे कोरोनाचा मृत्यूदर 3.2 आहे. गंभीर रुग्णांची संख्यादेखील कमी आहे. देशातील एकूण कोरोना संक्रमितांपैकी 0.33% वेंटीलेटरवर आहेत, तर 1.5% रुग्ण ऑक्सीजन सपोर्टवर आहेत. 2.34% रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. मृतांमध्ये 65% पुरुष आणि 35% महिला आहेत.
या राज्यात डबलिंग रेट नॅशनलपेक्षाही कमी
अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, अनेक राज्य संक्रमण रोखण्यात चांगले काम करत आहेत. यात 7 असे राज्य आहेत, जिथे संक्रमितांचा डबलिंग रेट 11 ते 20 दिवसांचा आहे. यात दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, ओड़ीसा, राजस्थान, तमळनाडू आणि पंजाब आहे. याचप्रमाणे 5 असे राज्य आहेत, जिथे 40 दिवसात संक्रमितांची संख्या दुप्पट झाली आहे. यात कर्नाटक, लद्दाख, हरियाणा, उत्तराखंड आणि केरळ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.