आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Donor Made So That Children Of 'Aryan' Breed Are Born, Demand For 'potential IAS' Sperm In The Country, Sperm Donation Scam Spread On Social Media: Donor Becomes 'Arya' Child, Potential 'IAS' Sperm In High Demand

सोशल मीडियावर पसरले स्पर्म डोनेशनचे जाळे:'आर्य' वंशाची मुले जन्माला यावी म्हणून बनला डोनर, संभाव्य 'IAS' स्पर्मची मोठी मागणी

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

2012 मध्ये आयुष्मान खुरानाचा एक चित्रपट आला होता; त्याचे नाव होतं 'विकी डोनर'. चित्रपटात आयुष्मान खुराना एका तरुणाची भूमिकेत आहे जो पैशासाठी स्पर्म दान करत असतो. यातून त्याला मोठा पैसा मिळत असतो. पण जेव्हा तिच्या पार्टनरला ही गोष्ट कळते तेव्हा ती खूप नाराज होते.

पण जेव्हा चित्रपटातल्या आयुष्यमानच्या पार्टनरला म्हणजे यामी गौतमीला हे कळते की त्याच्या स्पर्ममुळे आई होऊ न शकणाऱ्या स्त्रियांची आई होण्याची स्वप्ने पूर्ण होत आहे तेव्हा तिला खूप आनंद होतो.

हा झाला आपल्या फिल्मी दुनियेतल्या कथेचा विषय. पण, आजकाल असेच काही खऱ्याखूऱ्या आयुष्यातही घडू लागले आहे. पण चित्रपटात विकी पैशासाठी स्पर्म डोनेट करत असतो, तर वास्तविक जीवनात काही 'सुपर डोनर' आपली वंश वाढवण्यासाठी आणि कथित पुरुषत्वाच्या बाता मारण्यासाठी असे करतात.

इंटरनेट हे स्पर्म डोनरचे आश्रयस्थान बनले आहे. सोशल मीडिया साइट्सवर शेकडो स्पर्म डोनर आहेत, जे आई बनू इच्छिणाऱ्या महिलांना 'चांगल्या वंशाची मुले' देण्याचे वचन देतात.

त्यापैकी काहीजण पैशासाठी हे करत असतात, तर काहींजणांना आपली लैंगिक इच्छा पूर्ण करायची असते. पण काही लोग असेही आहेत जे केवळ आपल्या वंशत्वाची लोकसंख्या वाढवण्यासाठी स्पर्म डोनर बनले आहेत.

चला, आता आम्ही तुम्हाला स्पर्म डोनर जगाच्या सर्व पैलूंबद्दल सांगत आहोत.

सर्वप्रथम हे जाणून घेऊया की हे प्रकरण चर्चेत का आहे?

खरे तर लंडनमधून प्रसिद्ध होणाऱ्या ‘द संडे टाईम्स’ या नामांकित वृत्तपत्राने एका शोध अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालानुसार, ब्रिटनमध्ये ऑनलाइन बेकायदेशीर स्पर्म डोनेशन सिंडिकेट महिलांच्या छळाचे साधन बनत चालला आहे.

अहवाल समोर आल्यानंतर यासंदर्भातील सर्व बाबींवर चर्चा सुरू झाली आहे. त्यात स्पर्म डोनरची पद्धत, नैतिकतेचा प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवर लोकांची प्रतिक्रिया आल्या आहेत पण सगळ्यांच्या मतामध्ये भिन्नता दिसून आलीये. यासाठी अद्याप कोणताही स्पष्ट असा कायदा अस्तित्वात नाही.

'गोरे-आर्य' मुले जन्माला यावे, म्हणून तो झाला 800 मुलांचा बाप

'द संडे टाइम्स'च्या वृत्तानुसार, ब्रिटनमधील कट्टर उजव्या पंथाशी सलग्न असलेल्या एका व्यक्तीने आतापर्यंत 800 हून अधिक महिलांना स्पर्म डोनेट केले आहेत. असे करून तो ब्रिटनमधील 'गोरे-आर्य' वंशाची लोकसंख्या वाढवत आहे, या माणसाच्या मते ब्रिटनमधील गोर्‍या वंशाची वंशावळ वाढवण्याचं या पुरुषाला इतकं वेड आहे की, तो स्वखर्चाने माता होऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांना स्पर्म पाठवतो.

स्पर्म डोनेशनच्या बहाण्याने महिला बलात्काराला बळी पडताहेत

स्पर्म डोनरकडून बलात्कार झालेल्या काही महिलाही समोर आल्या आहेत. रिपोर्टनुसार, एका महिलेला तीला स्पर्म डोनरने एका हॉटेलच्या खोलीत त्याचे गोठलेले स्मर्म देण्यासाठी बोलावले होते. मात्र महिला तेथे पोहोचल्यावर या स्पर्म डोनरने तिच्यावर जबरदस्ती केली. लाजेपोटी इज्जतीमुळे या महिलेने तिच्या कुटुंबियांना किंवा पोलिसांनाही सांगितले नाही. आता ती महिला त्याच बलात्कारी डोनरच्या मुलाची आई होणार आहे.

भारतातही तयार असे गट आहेत, जे ग्राहकांशी ऑनलाइन व्यवहार करतात

ब्रिटनप्रमाणे भारतातही वंश वाढवण्यासाठी पैसे न घेता स्पर्म डोनेशनची प्रकरणे अजून समोर आलेली नाहीत. भारतात हे मुख्यतः पैशासाठी केले जाते. स्पर्म डोनर हे सहसा बेरोजगार किंवा अभ्यासू तरुण असतात. फेसबुकसह अनेक सोशल मीडिया साइट्सवर असे गट तयार करण्यात आले आहेत, ज्यावर देणगीदार त्यांचे संभाव्य ग्राहक शोधत असतात.

'बेस्ट स्पर्म' नावाच्या अशाच एका फेसबुक ग्रुपमध्ये एका दात्याने स्वत:ला स्मार्ट, निरोगी, धार्मिक आणि नॉन-अल्कोहोलिक असे सांगून ग्राहकांना मेसेज करण्यास सांगितले होते. यासोबतच त्यांनी लिहिले की, तो लोकांना त्यांचे कुटुंब वाढवण्यात मदत करेल आणि त्यांच्या गोपनीयतेचीही काळजी घेईल.

नियम असे आहे की डोनर आणि आई हे एकमेकांबद्दल अनभिज्ञ असले पाहिजे

देशात जरी डोनर आणि ग्राहक देशामध्ये एकमेकांशी व्यवहार करत असले तरीही. ही स्पर्म डोनर करण्याची योग्य आणि कायदेशीर पदधत नाहीये. श्री IVF क्लिनिक, मुंबईचे डॉक्टर जय मेहता यांच्या मतानुसार, देशात असा नियम आहे की स्पर्म डोनरला त्याच्याकडून कोणती महिला आई होणार आहे हे माहित नसावे. तसेच स्त्रीला हे देखील माहित नसावे की स्पर्म डोनर कोण आहे? मान्यताप्राप्त सरकारी स्पर्म डोनरच्या बँकेच्या मदतीने हे दोन्ही अप्रत्यक्षपणे जोडले जावे.

डोनरटी आणि प्राप्तकर्त्याची ओळख लपवली जाते जेणेकरून स्पर्म डोनर नंतर झालेल्या अपत्त्यावर दावा करू शकत नाही. मात्र, UK मध्ये स्पर्म डोनरकडून जन्माला आलेले मूल 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या जैविक वडिलांना भेटू शकते, असा नियम आहे.

दिल्लीत 'IAS मटेरियल' स्पर्मची किंमत जास्त आहे

ऑनलाइनशिवाय दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतील स्पर्म बँकमध्ये जाऊन वीर्य विकले जात आहे. दिल्लीसारख्या शहरात अशा शेकडो स्पर्म बँका आहेत, जिथे तरुण 400 ते 600 रुपयांना आपले स्पर्म विकतात.

दक्षिण दिल्लीत राहणाऱ्या सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करणाऱ्या 22 वर्षच्या राहुलने दिव्य मराठीला महिला टीमला सांगितले की, 'आम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा स्पर्म डोनेट करतो. आमच्या प्रमाणेच शिकलेल्या 'IAS मटेरियल विद्यार्थ्यांच्या' स्पर्मला खूप मागणी आणि त्याची किंमतही जास्त असते.

ICMR ने स्पर्म डोनरसाठी नियम बनवले आहेत, पण त्याचे पालन केले जात नाही

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने देशातील स्पर्म डोनरसाठी नियम आणि नियमांची संपूर्ण यादी तयार केली आहे. परंतु सत्य परिस्थिती हीच आहे की हे नियम काटेकोरपणे पाळले जात नाहीत.

नातेवाईक स्पर्म डोनेट करू शकत नाहीत

अनेक अपत्यहीन जोडप्यांना स्वतःच्या वंशावळीतून स्पर्म मिळावेत अशी इच्छा असते. परंतु ICMR मार्गदर्शक तत्त्वात ते योग्य मानले गेले नाही. यानुसार पती-पत्नीचे नातेवाईक किंवा मित्र त्यांना स्पर्म डोनेट करू शकत नाहीत.

6 महिने डीप फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर स्पर्मचा वापर केला जातो

ICMR च्या नियमांनुसार स्पर्म वापरण्यापूर्वी 6 महिने ते डीप फ्रीजरमध्ये ठेवले जातात. या दरम्यान स्पर्म आणि दात्याची तपासणी केली जाते. रक्तदात्याला HIV, हिपॅटायटीस बी-सी, TB, कर्करोग किंवा इतर कोणताही अनुवांशिक आजार आहे की नाही हे पाहिले जाते. सर्व चाचण्या पार केल्यानंतरही त्या स्पर्मचा उपयोग गर्भाधारनेसाठी केला जातो.

चाचणी दरम्यान स्पर्ममध्ये काही दोष आढळल्यास ते नष्ट केले जाते.

देशात स्पर्मना इतकी मागणी का आहे?

अर्न्स्ट अँड यंगच्या 2015 च्या अभ्यासानुसार, देशातील 10 ते 12% जोडपी वंध्यत्वाच्या समस्येने त्रस्त आहेत. म्हणजेच, देशाच्या एकूण लोकसंख्येचा एक मोठा भाग मुले जन्माला घालण्यासाठी IVF सारख्या पद्धतींकडे लोकांचा कल आहे. यामुळेच अलिकडच्या वर्षांत देशात स्पर्मची मागणी झपाट्याने वाढली आहे.

विदेशी लोक स्वस्त स्पर्मसाठी भारतात येतात

जगभरात स्पर्मची मागणी झपाट्याने वाढली आहे. पाश्चात्य देशांतील कठोर कायदे आणि महागड्या उपचारांमुळे भारत IVF केंद्र म्हणून उदयास आला आहे. स्वस्त स्पर्ममुळे भारतात दरवर्षी 20 ते 25 हजार परदेशी लोक IVF करतात. दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांव्यतिरिक्त, लहान शहरांमध्येही आता IVF क्लिनिक्स मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...