आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पाईसजेटचे विमान एसजी-725 च्या इंजिनला रविवारी पाटणा विमानतळावर आग लागली. विमान पाटण्याहून दिल्लीला जात होते. आग लागल्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले आहे. आगीमुळे इंजिनमधून धूर येऊ लागला.
रविवारी दुपारी 11.55 वाजता विमानाने उड्डाण केले. 12.20 वाजता विमानात स्फोट होऊन आग लागली. 10 मिनिटांनंतर वैमानिकाने काळजीपूर्वक विमान विमानतळावर उतरवले.
DGCAने सांगितले की, पक्षी धडकल्यानंतर इंजिनला आग लागली. यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवासी विमानतळाच्या आत आहेत. सर्वांना दुपारी चार वाजता दुसऱ्या विमानाने दिल्लीला पाठवण्याची तयारी सुरू आहे.
कोणताही प्रवासी जखमी नाही
विमानात 185 प्रवासी होते. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. इंजिनला आग कशामुळे लागली हे तपासानंतरच स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
3 पंखे क्षतिग्रस्त
स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाटणा-दिल्ली स्पाईसजेट फ्लाइटच्या कॉकपिट क्रू रोटेशन दरम्यान, टेक-ऑफनंतर इंजिन क्रमांक 1 वर एका पक्ष्यावर आदळले. खबरदारी म्हणून, फ्लाइट कॅप्टनने इंजिन क्रमांक 1 बंद केले आणि पाटण्याला परतले. उड्डाणानंतरच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, पक्षी धडकल्याने 3 पंखे खराब झाले आहेत.
मोठा आवाज झाला आणि आग लागली
या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरून टेक ऑफ होताच मोठा आवाज झाला. आवाज एवढा मोठा होता की सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर आगीच्या ज्वाळा वाढू लागल्या. त्यानंतर विमानतळावर गोंधळ उडाला.
पायलट म्हणाला- परिस्थिती नियंत्रणात आहे, मग जीवात जीव आला
फ्लाइटमध्ये बसलेल्या प्रवाशाने सांगितले की, खिडकीतून स्पार्क होताना दिसत होते. आम्ही खिडकीच्या बाजूला बसलो होतो. आगीची ठिणगी स्पष्ट दिसत होती. यादरम्यान पायलट म्हणाला - परिस्थिती नियंत्रणात आहे. मग जीव भांड्यात पडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.