आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • SpiceJet Boeing B737 Mumbai Durgapur Flight Suffers Severe Turbulence । 40 Passengers Injured In Plane Turbulence Before Landing

वादळात अडकले स्पाइसजेटचे विमान:लँडिंगपूर्वी विमानातील टर्ब्युलन्समुळे 40 प्रवासी जखमी; 10 जणांची प्रकृती गंभीर

दुर्गापुर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी मुंबईहून पश्चिम बंगालमधील दुर्गापूरला जाणारे स्पाइसजेटचे बोइंग B737 विमान वादळात अडकले. त्यामुळे यात स्वार सुमारे 40 प्रवासी जखमी झाले. यापैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, वैमानिकाच्या कौशल्यामुळे विमान धावपट्टीवर सुखरूप उतरले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान दुर्गापूरच्या काझी नजरुल इस्लाम विमानतळावर उतरत असताना ते बैसाखी वादळात अडकले. त्यानंतर विमानातील टर्ब्युलन्समुळे केबिनमध्ये ठेवलेले सामान खाली पडू लागले आणि यात सुमारे 40 प्रवासी जखमी झाले.

स्पाइसजेटने दिले मदतीचे आश्वासन

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, पायलटने धोका लक्षात येताच सीट बेल्टची खूण ऑन केली होती. यानंतरही खाद्यपदार्थांच्या ट्रॉलीला धडकल्याने दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. सीट बेल्टची ऑन केल्यावर फूड सर्व्हिस बंद करायला हवी होती, असे एका अज्ञात अधिकाऱ्याने सांगितले. तसेच सर्व प्रवासी त्यांच्या जागेवर पोहोचायला हवे होते, मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले.

विमान उतरताच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने जखमींना सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही सांगितले आहे.

काल बैसाखी म्हणजे काय?

गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारा या एप्रिल आणि मेमध्ये पूर्व भारतातील सामान्य हवामान घटना आहेत. त्याला काल बैसाखी किंवा नॉर्वेस्टर म्हणतात. झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये काल बैसाखीचा प्रभाव दिसून येत आहे. हे मुख्यतः वैशाख महिन्यात होते, म्हणून याला काल बैसाखी म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...