आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील पहिली सीप्लेन सेवा:स्पाईसजेट कंपनीने घेतली सीप्लेनची चाचणी; शनिवारपासून पर्यटकांसाठी सुरू होणार सेवा

पणजीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचा होईल शुभारंभ, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय यांची माहिती

पणजीत मांडवी कप्तान खात्याच्यावतीने फ्लोटिंग जेटी उभारली आहे. या जेटीवर रविवारी सायंकाळी एक ‘सी प्लेन' उतरले. अनेकांना नक्की हा काय प्रकार आहे हे समजून आले नाही. रविवार असल्याने रस्त्यांवर ये-जा करणाऱ्यांची संख्या कमीच होती. सायंकाळी स्पाइसजेट कंपनीचे एक ‘सी प्लेन' घिरट्या घालत मांडवी नदीत उतरले आणि ते थेट पाण्यावर तरंगत बंदर कप्तान खात्याने निर्माण केलेल्या फ्लोटिंग जेटीवर येऊन थांबले. मिळालेल्या माहितीनुसार स्पाइसजेट कंपनीने पर्यटकांसाठी ही सेवा सुरू करण्याकरिता चाचणी घेतली आहे. सोमवारी सकाळी या विमानाने टेक ऑफ घेतले.