आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीशकुमारांच्या पक्षात बंडखोरी:मणिपूरमधील JDU चे 6 पैकी 5 आमदार BJPत; पक्षाच्या NDA सोडण्याच्या निर्णयावर नाराज

इम्फाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जदयुच्या शनिवारी पाटण्यात होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. मणिपूरमध्ये जदयुच्या 6 पैकी 5 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सर्वजण भाजपत गेलेत. यात के.एच. जॉयकिशन, एन. सनाते, मोहम्मद अच्छब उद्दीन, माजी पोलिस महासंचालक ए.एम. खाउटे व थांगजाम अरुण कुमार यांचा समावेश आहे.

मणिपूर विधानसभा सचिवालयानेही या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट केले आहे. जदयुने गत मार्च महिन्यात झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत 38 जागांवर उमेदवार दिले होते. त्यातील 6 उमदेवारांचा विजय झाला होता. आता तिथे पक्षाचा केवळ एक आमदार उरला आहे.

NDA सोडल्यामुळे होते आमदार नाराज

जदयु नेते तथा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काही दिवसांपूर्वीच एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी राजद व काँग्रेसच्या मदतीने राज्यात महाआघाडी सरकार स्थापन केले होते. मणिपूरमधील जदयुचे आमदार त्यांच्या या निर्णयावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपत प्रवेश करून नितीश यांना जोरदार धक्का दिला. जदयुने आमदारांचे हे कृत्य घटनाबाह्य असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपने या आमदारांचे खुल्या दिलाने स्वागत केले आहे.

सुशील मोदी म्हणाले -बिहारलाही जदयुमुक्त करणार लालू

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी या प्रकरणी जदयुवर उपरोधिक निशाणा साधला आहे. ते एका ट्विटमध्ये म्हणाले -अरुणाचलनंतर मणिपूरही जदयुमुक्त झाली. आता लालूजी खूप लवकर बिहारलाही जदयुमुक्त करतील. अरुणाचल प्रदेशातील जदयुच्या एका आमदाराने भाजपत प्रवेश केला होता. सुशील मोदी याचा दाखला देत बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...