आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sports Mahakumbha Begins In Gujarat; Modi's Assertion That This Is A Confluence Of Youth | Marathi News

क्रीडा:गुजरातमध्ये क्रीडा महाकुंभाला सुरुवात; हा युवाशक्तीचा संगम असल्‍याचे मोदी यांचे प्रतिपादन

अहमदाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : धवल भरवाड,  अहमदाबादचे सरदार पटेल स्टेडियम - Divya Marathi
छायाचित्र : धवल भरवाड,  अहमदाबादचे सरदार पटेल स्टेडियम

गुजरातमध्ये शनिवारी क्रीडा महाकुंभ २०२२ सुरू झाला आहे. अहमदाबादच्या सरदार पटेल मैदानावर त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ११०० लोककलावंतांच्या समूहाने गुजरात-भारतीय संस्कृतीवर अनेक कार्यक्रम सादर केले. मोदी म्हणाले, माझ्यासमोर तरुणाईचा हा सागर आहे. गुजरातचा तरुण आकाशात भरारीसाठी तयार आहे. हा केवळ क्रीडा महाकुंभ नसून यात गुजरातच्या युवाशक्तीचा संगम झाला आहे. त्याचाच हा महाकुंभ आहे. कोरोनामुळे दोन वर्षे क्रीडा महाकुंभामध्ये खंड पडला होता. परंतु या आयोजनामुळे नवीन उत्साह संचारला आहे, असे मोदींनी सांगितले. याआधी मोदींनी रोड शो केला. तत्पूर्वी ते राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ गांधीनगरच्या दीक्षांत समारंभात सहभागी झाले होते.

वर्ष २०१० मध्ये मोदी राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हापासून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी याची सुरुवात झाली होती. तेव्हा १६ लाख स्पर्धकांनी नोंदणी केली होती. यंदाचे अकरावे वर्ष आहे. त्यासाठी ७५ लाखांवर नोंदणीची अपेक्षा आहे. महाकुंभात लहान मुलांपासून वयस्कर गटापर्यंत क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.

बातम्या आणखी आहेत...