आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sports Minister And Governor Are Also Reaching At The Crime Ground To Bid Farewell To UdanSikh Milkha Singh.

अखेरचा प्रवास:मिल्खा सिंह यांच्यावर चंदिगडमध्ये अंत्यसंस्कार, अंत्यविधीमध्ये केंद्रीय क्रिडा मंत्री किरण रिजिजूंचीही उपस्थिती

चंदीगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुद्वारा साहिबपासून फुलांनी सजलेल्या वाहनामधून मिल्खा सिंह यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आले.

महान धावपटू मिल्खा सिंह यांच्यावर शनिवारी संध्याकाळी चंदीगडच्या मटका चौक येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे वयाच्या 91 व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान केंद्रीय क्रिडा मंत्री किरण रिजिजू, पंजाबचे राज्यपाल व्हीपी सिंह बदनौर आणि हरियाणाचे क्रिडा मंत्री संदीप सिंह यांचीही उपस्थिती होती. यापूर्वी सेक्टर-8 च्या गुरुद्वारा साहिबपासून फुलांनी सजलेल्या वाहनामधून मिल्खा सिंह यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आले.

मिल्खा सिंह यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या वाहनातून स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आला.
मिल्खा सिंह यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या वाहनातून स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आला.

सकाळी मिल्खा सिंह यांचे अंत्यदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, क्रिडामंत्री राणा गुरजीत सोढी, आरोग्यमंत्री बलवीर सिंह सिद्धू, अर्थमंत्री मनप्रीत सिंह बादल, अकाल दलाचे विक्रमसिंह मजीठिया, माजी अकाली नेते सुखदेव सिंह ढींडसांसह अनेक दिग्गज पोहोचले.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आपल्या मंत्र्यांसह मिल्खा सिंह यांच्या घरी पोहोचले.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आपल्या मंत्र्यांसह मिल्खा सिंह यांच्या घरी पोहोचले.
अकाली दलाचे नेते विक्रम सिंह मिजीठिया यांनी श्रद्धांजली वाहिली.
अकाली दलाचे नेते विक्रम सिंह मिजीठिया यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मिल्खा सिंहांचे पुत्र जीवी मिल्खा सिंह यांची भेट घेतली आणि म्हटले की, तुमचे पिता हे देशाची शान होते. कॅप्टन म्हणाले की, ते नेहमीच एक उत्साही व्यक्ती होते आणि आजच्या पीढीसाठी ते प्रेरणा देणारे होते.

माजी अकाली दल खासदार सुखदेव ढींढसा पोहोचले.
माजी अकाली दल खासदार सुखदेव ढींढसा पोहोचले.

माजी अकाली नेते सुखदेव ढींडसाने म्हटले की, मिल्खा सिंह नेहमीच आपल्या आरोग्याविषयी खूप जागृक होते. त्यांनी म्हटले की, गेल्या दोन महिन्यांपूर्वी ते भेटले होते आणि यावेळी जुन्या आठवणी काढत खूप गप्पा मारल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...