आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Spouses Dispute Increased, 92 Thousand Complaints In 11 Days In Women's Commission; The Matter Reached The High Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिघडलेले वातावरण:पती-पत्नीची भांडणे वाढली, महिला आयोगामध्ये 11 दिवसांत 92 हजार तक्रारी; प्रकरण हायकोर्टात पोहोचले 

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

पवन कुमार

देशव्यापी लॉकडाउनमुळे घरातील वातावरण बिघडू लागले आहे. सतत घरात राहिल्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडणांचे प्रमाण वाढले आहे. केवळ 11 दिवसांत राष्ट्रीय महिला आयोगाची देशभरात वेगवेगळ्या हेल्पलाइनवर घरगुती हिंसाचाराशी संबंंधित 92 हजार तक्रारी आल्या आहेत. हैराण करणाऱ्या आकड्यांवर चिंता व्यक्त करत एका स्वयंसेवी संस्था इंडिया काउंसिल ऑफ ह्यूमन राइट्स, लिबर्टीज अँन्ड सोशल जस्टिसने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 

याचिकाकर्त्याने लॉकडाउनमध्ये घरगुती हिंसाचाराच्या शिकार झालेल्या महिलांची सुरक्षा, त्यांच्यासाठी वेगळे राहण्याची व्यवस्था आणि इत्तर मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. हायकोर्ट या याचिकेवर सुनावणीसाठी तयार झाले आहे. शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

देशभरात मुलांच्या शोषणाची प्रकारणेदेखील वाढली... 

याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, 24 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाउनमध्ये महिलांवर अत्याचार वाढले आहेत. देशभरात लहान मुलांच्या शोषणाचे प्रमाणही वाढले आहे. लॉकडाउनने मुलांच्या मदतीचे सर्व पर्याय बंद केले आहेत. अनेकदा मुले त्यांच्यासोबत हणाऱ्या अत्याचाराची माहिती आपले मित्र, शिक्षक किंवा पोलिसांना देतात. पण लॉकडाउनने त्यांना यासर्वांपासुन दूर केले आहे. आता त्यांना मदत मिळू शकत नाहीये.  

हेल्पलाइनची मागणी 

याचिकाकर्त्याने मागणी केली आहे की, लॉकडाउनमध्ये महिला आणि मुलांच्या सुरक्षेसंबंधी उपाय केले जावे. वेगळी हेल्पलाइन बनवली जावी, ज्याद्वारे महिला आणि मुलांना त्वरित मदत मिळू शकेल. महिला आणि मुलांच्या काउन्सिलिंगसाठी नोडल अधिकारी नियुक्त केले गेले पाहिजे. 

बातम्या आणखी आहेत...