आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋतूने कूस बदलली:काश्मीरमध्ये वसंत फुलला... दोन आठवडे आधी आगमन

श्रीनगर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : आबिद बट, श्रीनगरची बादामवाड़ी - Divya Marathi
छायाचित्र : आबिद बट, श्रीनगरची बादामवाड़ी

काश्मीर खोऱ्यात थंडीचा कडाका आेसरला आहे. याबरोबरच ऋतूने कूस बदलली. यंदा बर्फवृष्टी आधीच थांबल्याने वसंताचे आगमन पंधरा दिवस अगाेदर झाले आहे. त्यामुळे श्रीनगरसह खोऱ्यातील इतर ठिकाणी वसंताेत्सव दिसू लागला आहे. म्हणूनच बादामवाडी उद्यानातील पांढरट गुलाबी फुलांचा बहर वसंताच्या आगमनाची वार्ता देताे. ऋतू बदल लवकर झाल्याने ट्युलिपही लवकर फुलू लागेल असे वाटते. दिवसाचे तापमान सरासरीहून जास्त : जम्मू-काश्मीरमध्ये दिवसभराचे तापमान सरासरीहून जास्त असल्याची नाेंद झाली आहे. दक्षिण काश्मीरमध्ये रविवारी तापमानाचा पारा १९.१ अंश सेल्सियस हाेता. ताे सरासरीहून जास्त आहे. जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये १९ मार्चपर्यंत पारा सरासरीहून जास्त राहू शकताे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...