आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sresha Bandla Born In Andhra Pradesh, Will Go On A Space Trip, The Second Woman Of Indian Descent After Kalpana Chawla

अंतराळ भ्रमंती:आंध्रात जन्मलेली श्रीशाही अंतराळ सफरीवर जाणार, कल्पना चावलानंतर भारतवंशीय दुसरी महिला

हैदराबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

व्हर्जिन गॅलेक्टिक कंपनीचे मालक रिचर्ड ब्रेन्सन ११ जुलै रोजी अंतराळ भ्रमंतीवर जाणार आहेत. या सफरीवर त्यांच्यासमवेत भारतात जन्मलेली श्रीशा बांदला देखील जातील. श्रीशा कंपनीत सरकारी विभागाशी संबंधित अधिकारी आहेत. रिचर्ड यांच्यासमवेत इतर पाच प्रवासीही असतील. श्रीशा बांदलाचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. अंतराळ प्रवासावर जाणारी श्रीशा भारतवंशीय दुसरी महिला ठरेल. या आधी कल्पना चावला अंतराळात गेली होती. परंतु दुर्देवाने त्यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला.ब्रेनसनचे अंतराळ यान न्यू मेक्सिकोतून उड्डाण करेल. त्यात चालक दलाचे सर्व सदस्य कंपनीचे कर्मचारी असतील. व्हर्जिन गॅलेक्टिकचे चौथे अंतराळ उड्डाण असेल. या आधी जेफ बेजोस यांची कंपनी ब्लू आेरिजिनने बेजोस २० जुलै रोजी अंतराळात जातील, असे स्पष्ट केले होते.

यूथ स्टार अवार्डची मानकरी
श्रीशाचे शिक्षण अमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये झाले. अंतराळ विज्ञानाची त्यांना आवड असल्यामुळे विमान तसेच अंतराळसंबंधी अभियांत्रिकी विषयात त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठातून एमबीए केले. त्यानंतर त्यांनी स्पेसफ्लाइट कंपन्यांपैकी सीएएसएफच्या अंतराळसंबंधी धोरण ठरवणाऱ्या विभागात काम केले. श्रीशा यांना त्यांच्या कामगिरीबद्दल तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या वतीने यूथ स्टार अवार्ड देऊन गौरवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...