आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काशीपीठात जगद््गुरू पंचाचार्य जयंती:श्री जगद्गुरू पंचाचार्य आद्य दार्शनिक सूत्रकार : डाॅ. चंद्रशेखर शिवाचार्य

वाराणसी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच पीठांचे परमाचार्य श्री जगद्गुरू रेणूक, दारुक, घंटाकर्ण, धेनूकर्ण, विश्वकर्ण हे जगद्गुरू पंचाचार्य जगातील आद्य दार्शनिक सूत्रकार आहेत असे विचार काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आशीर्वचनात सांगितले. काशीपीठामध्ये आयोजित रेणुकादी पंचाचार्य युगमानोत्सवानिमित्त आयोजित धर्मसभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की श्री जगद्गुरू पंचाचार्यांनी शिवाच्या आदेशानुसार चार युगामध्ये लिंगातून अवतार घेतले. देव, दानव, मानव आणि ऋषी या सर्वांना इष्टलिंग प्रदान केले. शिवाद्वैत तत्वांचा पंचसूत्राद्वारे उपदेश केला. यामध्ये पद्विधि:, वृष्टि:, लंबनम्, मुक्तागुच्छ:, पंचवर्ण: हे जगद्गुरू पंचाचार्यांनी बोध केलेले दार्शनिक आद्य सूत्र आहेत. आपल्या देशातील दार्शनिकांनी जीव, शिव, जगत्, बंध आणि मोक्ष या पाच विषयांवर चिंतन केले आहे. जगद्गुरू पंचाचार्य शिवसृष्टीतील आदीगण आहेत. गण म्हणजे समूहदेवता. हे पाच आचार्य पाच रूपात प्रकट झाले असले तरी वीरशैव धर्माची स्थापना हाच त्यांच्या अवताराचा मुख्य उद्देश

पाच जगद्गुरू एकाच वेळी प्रकट झाले आहेत. भूतलावर येण्याची त्यांची वेळ वेगवेगळी आहे. संघटनदृष्टीने सर्वांची जयंती एकत्रित साजरी करणे संयुक्तिक आहे. काशीपीठामध्ये पाच मूल आचार्यांचे उद्भवलिंग सांकेतिक रूपाने विद्यमान आहेत. सोमेश्वरलिंग, सिद्धेश्वरलिंग, भीमनाथलिंग, मल्लिकार्जुनलिंग, विश्वेश्वरलिंग हे पीठात आहेत. प्रातःकाली या सर्व लिंगांची विधिवत पूजा, बिल्वार्चना, आरती तसेच संध्याकाळी धर्मसभा संपन्न झाली. पीठातील श्री अखिलेश देव, श्री अभिषेक देव, श्री चन्नबसव देव, श्री बोम्मलिंग देव आणि श्री बसय्या देव यांनी एकेक पीठाचा संपूर्ण इतिहास भक्तांना समजावून सांगितला. या सभेस रेवणसिद्ध शाबादे (लातूर) आर. के. स्वामी, शिवानंद हिरेमठ, शिवकुमार स्वामी तसेच सर्वप्रांतीय सद्भक्त बहुसंख्येने उपस्थित होते. धर्मसभेचे सूत्रसंचालन गुरुकुलचे विद्यार्थी प्रभू स्वामी यांनी केले. काशीपीठात जगद्गुरु रेणुकाचार्य जयंती प्रसंगी काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, आर. के. स्वामी, शिवानंद हिरेमठ, शिवकुमार स्वामी आणि काशीपीठ विद्वत संघाचे विद्यार्थी.

बातम्या आणखी आहेत...